शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्मार्ट पाटीने मराठी भाषा विकासाचा शाळांचा प्रयत्न; मराठी भाषा दिन विशेष उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:02 PM

लेखन - वाचन करण्यासाठी आनंददायी, आकर्षक उपक्रम

- अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आगवन शिशुपाडा या शाळेत लेखन - वाचन करण्याची पद्धत आनंददायी करण्यासाठी आकर्षक रंगीत तसेच स्मार्ट पाटीचा उपक्रम राबविला जात आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांची बोलीभाषा वारली असून ते मराठीतून शिक्षण घेतात. त्यामुळे अध्ययन-अध्यापनात हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतील शब्दसंपत्तीत वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळेच विद्यार्थी प्रगल्भ बनून शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवता येईल या संकल्पनेतून ‘स्मार्ट पाटी’ची निर्मिती करण्यात आल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका वरुणाक्षी आंद्रे यांनी दिली.या पाटीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यावर विद्यार्थी अक्षरलेखन, गिरवणे, चौदाखडी, अक्षरापासून शब्द तयार करणे, अक्षर कोडी सोडविणे (वार, रंग, फुले-फळे, वाहनांची नावे) छोटी वाक्य तयार करणे अशा कृती विद्यार्थी स्केचपेनने पाटीवर लेखन-वाचन सराव करता येतात. त्यानंतर कापडाने पाटी पुसून पुन्हा वापरण्यास तयार होते. अशा कृतीयुक्त वैयक्तिक व गट पद्धतीने विद्यार्थी शिकत आहेत. स्मार्ट पार्टीच्या सरावाने विद्यार्थी प्रगत होतील, असा विश्वास उपक्रम राबवणाऱ्या या शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.