शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शाळकरी मुलांच्या बॅगेत चॉकलेटऐवजी सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:22 IST

कोरोनाची भीती कायम

- शशिकांत ठाकूरकासा : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने  गेल्या दोन महिन्यांपासून शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले, तर २७ जानेवारीपासून  इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही सदर वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाची अद्याप  भीती कायम असल्याने व दक्षता म्हणून एरव्ही चॉकलेट, खाऊ बॅगेत ठेवणारे विद्यार्थी आता बॅगेत सॅनिटायझरही आवर्जून  ठेवत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. मात्र, तब्बल  नऊ महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची घटणारी संख्या व  कोरोनावर लस सापडली असून आता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे  ग्रामीण भागात ८० ते ९० टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार झाले आहेत. जिल्ह्यातील शहरी भागांतील शाळाही सुरू झाल्या असून तिथेही ६० ते ७० टक्के पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दर्शवली आहे. यामध्ये  बोर्ड परीक्षा विचारात घेऊन १० वीची विद्यार्थीसंख्या शाळांना जास्त उपस्थिती दिसते.शासनाच्या आदेशानुसार आता  तीन ते चार तास शाळा भरवली जाते आणि सलग मध्ये कोणतीही सुट्टी नसते. त्यामुळे विद्यार्थी घरूनच जेवून येतात. विद्यार्थ्यांनी स्वतःची पाणीबॉटल  आणावी. शाळा परिसरात  कोणत्याही इतर बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही, अशा सूचना आहेत. दरम्यान, गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे पालक मुलांना बाहेरील वस्तू खाण्यास देत नाहीत. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या, तरी मुले कोरोनाच्या भीतीने बाहेरील वस्तू सहसा खात नाहीत. बऱ्याच महिन्यांपासून बाहेरील वस्तू मिळत नसल्याने मुलांनाही त्याची जाणीव होऊ लागली आहे. पालकही या बाबतीत मुलांना सूचना देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एरव्ही चॉकलेट व इतर खाऊ बॅगेत आणणारे विद्यार्थी आता आणत नाहीत. मात्र, कोरोना खबरदारी उपाय म्हणून सॅनिटायझर बॅगेतून आणत आहेत. प्रवासात व शाळेत कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही सॅनिटायझर वापरतो. - राज वाघ, इयत्ता ६ वी.शाळेत आल्यावर काही वस्तूंना स्पर्श होतो. त्यामुळे कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून बॅगेत सॅनिटायझर ठेवतो.- प्रणय चौरे, इयत्ता १० वी शाळा सुरू झाली आहे, तरी अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे आमच्याजवळ सॅनिटायझर ठेवतो.- श्रेयस ठाकूर, इयत्ता ६ वी आपले हात स्वच्छ राहावे.  त्यामुळे कोरोना खबरदारी म्हणून आम्ही बॅगेत सॅनिटायझर घेऊन येतो.- मनस्वी पाटील, इयत्ता १० वी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या