शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर फाटक जवळील ९ पानशॉप मधून गुटखा विक्री; १० जणांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: December 9, 2023 22:52 IST

अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत पवार, माणिक जाधव व भरत वसावे ह्या तिघांनी वरिष्ठांच्या आदेशा नुसार नवघर पोलिस ठाण्यातील जे जे मुल्ला व किरण नेरपगार यांच्यासह मिळून भाईंदर पूर्वेच्या फाटक मार्गवरच्या पानशॉप वर गुरुवारी धडक कारवाई केली.

मीरारोड - मीरा भाईंदर शहरात सर्रास पान टपऱ्या हे प्रतिबंधित गुटखा विक्रीची केंद्र बनली असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाई केवळ भाईंदर फाटक परिसरातील ९ पान टपऱ्यां मधून गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले. 

अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत पवार, माणिक जाधव व भरत वसावे ह्या तिघांनी वरिष्ठांच्या आदेशा नुसार नवघर पोलिस ठाण्यातील जे जे मुल्ला व किरण नेरपगार यांच्यासह मिळून भाईंदर पूर्वेच्या फाटक मार्गवरच्या पानशॉप वर गुरुवारी धडक कारवाई केली. फाटक लगतच्या परिसरातील ९ पान टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा सर्रास विकला जात असल्याचे आढळले असून तेथून १० हजारांचा गुटखा साठा जप्त केला आहे. 

साईबाबा मंदिर जवळच्या ओमसाईधाम पान भांडारचा चालक सत्यनारायण तिलकधारी गुप्ता ( ५५ ) रा. अलकापुरी, नालासोपारा  ; शिवरुद्र अपार्टमेंट  मधील संजय पान शॉपचा संजय रामधनी गौड (४० ) ; टारझन बारच्या बाजूला विश्वकर्मा पान शॉप चा विजयकुमार रामखिलावन विश्वकर्मा ( ४३ ) ; अंजली बिल्डिंग मधील पारसनाथ भोजनालय पानशॉपचा भागवत जल्लू विश्वकर्मा ( ३६ ) रा. कृष्णधाम, साईबाबा रुग्णालय जवळ ; कस्तुरी बस स्टॉप जवळ  मंजय पान शॉपचा संजय रामधनी  गौड ( ३७ ) व बाबा पानशॉपचा अनिलकुमार रामधनी गौड ( ३७ ) दोघेही रा. शिवरुद्र अपार्टमेंट ; पांचाळ इस्टेट मधील मनोज पानशॉपचा मनोज शमानंद जयस्वाल ( ४६ ) रा. नर्मदा अभिषेक, नर्मदा नगर ; ज्योती बारच्या बाजूला जितू पानशॉपचा चालक जितबहाद्दर शिवभजन गुप्ता (३१ )  रा. संतोष भुवन, नालासोपारा व कस्तुरी बस स्टॉप मागे  प्रवीणकुमार पानशॉप चा प्रवीणकुमार हिरालाल प्रजापती ( ४६ ) ह्या ९ जणांच्या पान दुकानावर धाडी टाकून गुटखा साठा जप्त करण्यात आला. 

सदर पान टपरी चालकांनी त्यांना बबलू खान हा इसम गुटखा पुरवत असल्याची माहिती दिली. प्रशांत पवार यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ९ पानटपरी चालक व गुटखा पुरवणारा बबलू खान अश्या १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस