शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहतुकीचे नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:43 IST

वसईमध्ये रिक्षात प्रवाशांची कोंबाकोंब : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष ; कोरोनावाढीला निमंत्रण

मंगेश कराळेनालासोपारा : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यातच नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने चिंता व्यक्त होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून टीका केली जात आहे. वसईत सार्वजनिक प्रवासी सेवा हळूहळू रुळावर येत असली तरी ती अद्याप अपुरी आहे. त्यामुळे वसईकर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. मात्र दाटीवाटीने होणाऱ्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका आहे. प्रवासी साधन असलेल्या तीनचाकी रिक्षा, टाटा मॅजिकमधूनही धोकादायक वाहतूक सध्या वसईत सुरू असून त्यावर वाहतूक विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने वसईत कोरोनावाढीला आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे. रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना परवानगी असताना रिक्षाचालकांकडून नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची कोंबाकोंब करण्यात येते.

वसईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ हजारांच्या पार पोहोचला आहे. येथे या आजारामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही ८५३ पर्यंत पोहोचला आहे. कोविड चाचणी केलेल्या नागरिकांची व देखरेखीखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या मोठी असतानादेखील वसई-विरारमध्ये सर्रास प्रवासी वाहनांतून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे व आदेशांचे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने कसोशीने पालन केले पाहिजे. प्रवासी वाहतुकीचा तर अक्षरश: बोजवारा उडाला असून दाटीवाटीने प्रवासी नेण्याचे काम रिक्षाचालक करत आहेत. तीनचाकी रिक्षात केवळ दोनच प्रवाशांना नेण्याची मुभा रिक्षाचालकांना आहे, तर प्रवासी टाटा मॅजिकमध्येही नियमांचे बंधन आहे. परंतु रिक्षाचालक कमाईसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडत असल्याचे दिसते.सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधने अपुरी असल्याने नागरिकांना कामावर जाण्यासाठी किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी खासगी रिक्षाचालक रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत. रिक्षाचालकांच्या बेपर्वा वागणुकीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अजून वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

वसई तालुक्यात सर्रास रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून दाटीवाटीने प्रवाशांची वाहतूक करताना दिसत आहेत. देशात आणि राज्यात सध्या समूह संसर्गाचा धोका मोठा असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. अशा प्रसंगी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे असताना खासगी रिक्षाचालक मात्र कोरोनालाच धाब्यावर बसवून आर्थिक कमाईच्या कामात व्यस्त झाले आहेत. या अवैध कारभारावर वाहतूक विभागाने तत्काळ कारवाईसाठी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणार. नंतर या बाबीकडे जातीने लक्ष घालून लवकरच या रिक्षांवर आणि चालकांवर कारवाई करणार आहे.- विनोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

टॅग्स :vasai-acवसईSchoolशाळा