शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

संततधारेसह समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 00:00 IST

किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले.

- हितेन नाईकपालघर : मुसळधार पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या समुद्राच्या लाटांनी रविवारी दुपारी रौद्ररूप धारण केले होते. किमान चार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्याने समुद्रकिनारी राहणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले.सन २००२ मध्ये माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने सातपाटीच्या पश्चिमेस बांधलेल्या बंधाºयाला भगदाड पडल्याने पावसाळ्यात निर्माण होणाºया महाकाय लाटांचे पाणी बंधाºयाला पार करून गावात शिरू लागले होते. त्यामुळे बंधाºयालगतच्या अनेक घरांची पडझड होत घरातील जीवनावश्यक वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस होण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे मच्छीमार सहकारी संस्था, सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यांना यश येत पतन विभागाने नव्याने सुमारे ९०० मीटर्सच्या बंधारा उभारणीला परवानगी दिली होती.मागील वर्षभरापासून सुरू असलेले हे काम मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद पडले होते. परंतु जुलै महिन्यापासून समुद्र खवळलेला राहून महाकाय लाटा गावात शिरल्यास किनाºयावरील घरांना निर्माण होणारा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बाब म्हणून बंधाºयाच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. या धूप प्रतिबंधक बंधाºयाच्या कामाचे ठेकेदार वसंत चव्हाण यांनी युद्धपातळीवर बंधाºयाच्या कामाला सुरुवात करीत गावात समुद्राचे पाणी शिरण्याची भगदाडे बुजवून ५७५ मीटर्सचे काम जवळपास पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या बंधाºयाची उंची वाढविण्यात आल्याने समुद्राच्या लाटा आता थोपवून धरल्या जात असून समुद्राच्या वाढत्या उधाणाच्या महाकाय लाटांमुळे होणाºया वित्तहानीच्या घटना घडण्याची शक्यता धूसर बनली आहे. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाºयामुळे ४ ते ५ मीटर्सच्या लाटा निर्माण होत त्यांनी बंधारा पार केला असला तरी मच्छीमारांच्या घरात पाणी शिरून नुकसानीच्या घटना मात्र घडल्याचे दिसून आले नाही.कामगारवर्गात कोरोनाची भीती : सातपाटी येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने बंधाराउभारणीच्या कामासाठी उपलब्ध कामगारवर्ग सध्या संसर्ग होण्याच्या भीतीने कामावर येत नसल्याने ठेकेदारासमोर पेच निर्माण झाला आहे. या बंधाºयाचे उर्वरित काम येत्या महिनाभरात संपवून टाकण्याचे लक्ष्य आपण ठेवल्याचे चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही मच्छीमारांचे कुठलेही नुकसान होऊ नये, यासाठी जीवाची पराकाष्ठा करीत असताना या बंधाºयाच्या कामापोटी शासनपातळीवरून बिले निघत नसल्याने शासनाने आमचा सकारात्मक विचार करावा, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरारpalgharपालघर