शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींच्या रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:21 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन साकार होणाऱ्या मासवन नागझरी रस्ता पुर्णपणे उघडला असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे.

- आरिफ पटेलमनोर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन साकार होणाऱ्या मासवन नागझरी रस्ता पुर्णपणे उघडला असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे. या वर्षी २० जानेवारी ही या रस्त्याच्या पुर्णत्वाची तारीख होती मात्र, जागोजागी अपुर्ण काम त्यात निकृष्ट दर्जा यामुळे ५,५,८५००० कोटी निधी मंजूरीच्या या रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.पंचक्रोशीतील हजोरो नागरिकांना व विषेश करुन गरोदर महिला व रुग्णांना या रस्त्यावरुन जातांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यातच या रस्त्यावरील अनेक मोºयांचे कामही अर्धवट असल्याने ठेकेदार आर. के. सावंत यांना काळ्या यादीत का टाकू नये असा प्रश्न सागर पाटील यांनी विचारला आहे. या प्रकरणी अधीक्षक अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ठाणे कार्यालय यांना लेखी तक्रार करण्यात आली आहे.हा रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेला असून वर्क आॅर्डर व स्पेसिफिकेशन प्रमाणे काम न झाल्याचाच पुरावा आहे. डांबरापेक्षा काळ्या आॅईलचे प्रमाण अधिक तसेच खडीचे थर ठरल्या प्रमाणे न अंथरल्याने तो निकृष्ट दर्जाचा बनला आहे. दरम्यान या योजनेचे सहायक अभियंते तुषार बदानी यांनी सारवासारव करताना तेथून ओव्हर लोड गाड्या चालतात असे कारण दिले आहे. दरम्यान, रस्त्याचा दर्जा त्याच्या वापरावर आधारीत असल्याने ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेVasai Virarवसई विरारroad transportरस्ते वाहतूक