शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमधील आदिवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 23:58 IST

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष; विकासासाठी येणारा निधी जातो तरी कुठे?

जव्हार : राज्यात युतीचे सरकार जाऊन आता महाविकास आघाडीचेसरकार आलेले आहे. सरकारे दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र राज्याची राजधानी मुंबईपासून अवघ्या दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जव्हार या आदिवासी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आजही जशीच्या तशी कायम आहे. त्यामुळे आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी येणारा निधी जातो तरी कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.जव्हार भागातील गाव-पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी मिळूनही रस्त्यांची दुर्दशा आजही कायम आहे. कुठल्याही सरकारकडून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे होत नसल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सरकार कुठलेही असुद्या आमच्या रस्त्यांची कामे होत नाही, अशीच समज ग्रामीण जनतेने करून घेतलेली आहे.जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत. मात्र या तालुक्याला जोडणाºया रस्त्यांची कामे व्यवस्थितरीत्या होत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. शासनाकडून ग्रामीण भागासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळत असतो. मात्र तालुक्यातील गावांना जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे कुठलेही सरकार असो, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. जव्हार ते मोखाडा नाशिक रस्ता, जव्हार ते वाडा विक्रमगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. तसेच ग्रामीण आदिवासी भागातील देहेरे-मेढा रस्ता, केळीचापाडा साकूर झाप रस्ता, जामसर विनवळ रस्ता हे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या खेड्यापाड्यांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र आजही जव्हार तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.बुजवलेले खड्डे वर्षभरातच उखडलेतालुक्यात काही ठिकाणी डांबरीकरण तसेच खड्डे बुजविण्याची कामे झालेली आहेत. परंतु डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे वाहनचालक व नागरिक वैतागले आहेत. उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. जव्हार तालुक्यात साकूर, नांदगाव, साखरशेत, जामसर अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा भार अधिक असून यामध्ये गरोदर मातांना जव्हार ग्रामीण रुग्णालयात पोहचवत असताना खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक गरोदर मातांना कुटीर रुग्णालयात पोहचवताना प्रसूती झाल्याचे प्रकार घडले आहेत. वाहन चालक वैतागले असून, मोटारसायकल चालकांना अपघात झालेले आहेत.