शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! वसई-विरारमध्ये पुन्हा वाढतोय कोरोनाचा विळखा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:10 IST

दिवाळीनंतर रुग्णांत पुन्हा वाढ

 लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सुरुवातीला हाताबाहेर गेलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला घट झाल्याने वसईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता दिवाळीनंतर कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सध्या फेरीवाले, विक्रेते सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरताना आढळत आहेत. त्यांच्याकडील वस्तू, पदार्थ विकत घेतले जाताना दिसून येत आहे. तसेच नागरिकदेखील कोरोनाच्या बाबतीत पुरेशी सुरक्षा न घेता विनामास्क इतरत्र भटकत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, आता दिवाळी सणानंतर अचानक कोरोना रुग्ण वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या २७ हजार ५९९ झालेला  आहे. तर, या कोरोना आजारामुळे ८५० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आजारातून आजपावेतो २६ हजार २८० हून अधिक बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. 

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वसईतील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने खाली आल्याने वसई-विरारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू होती. मात्र, बुधवारी व गुरुवारी रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाचे सावट अद्याप मानगुटीवर असताना नागरिकांनी सुरक्षेचे नियम न पाळता बेजबाबदारपणे वागण्यामुळे वसई-विरार परिसरामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका संभवतो.

नागरिकांची विनामास्क दिवाळीदिवाळी सणामध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाने आवाहन करूनदेखील नागरिकांनी विनामास्क एकत्र येत दिवाळी साजरी केली. फटाक्यांवर बंदी असताना नागरिकांनी फटाके फोडले. यातून प्रदूषण झालेच, शिवाय फटाके फोडण्यासाठी नागरिक एकत्र आल्याचे दिसून आले. वसईतील मागील दोन दिवसांतील कोरोनावाढीचा वेग पाहता नागरिकांची बेपर्वाई पुन्हा कोरोनाची दुसरी लाट ओढवून घेण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालता येऊ शकतो, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस