शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

मनसे इंजिनाची रिक्षाला पॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:18 IST

पाठिंबा कुणाला?; कार्यकर्त्यांत संभ्रमच, पक्ष म्हणतो बविआला, कार्यकर्ते बुके देतात पंडितांना

बोईसर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना सत्तेवरून हटविण्यासाठी पक्षाची ताकद मोदी व शहा विरोधात उभी केली असून लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी बहुजन विकास आघाडी व तिचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा जाहीर केल्याने मनसेचे इंजिन महाआघाडीच्या रिक्षाची ताकद काहीशी वाढविणार असून ती शिवसेना-भाजप युती करता मारक ठरू शकते राजकीय व्यवस्थेला पूरक अशी मनसे हा पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या २००९ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे माजी आमदार अविनाश सुतार यांना मनसेने उतरवले होते. त्या निवडणुकीमध्ये सुतार यांना तिसऱ्या क्रमांकाची १८ हजार १०४ (१३.१२ टक्के) मते मिळाली होती.या निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्ष संघटना व अपक्ष असे मिळून एकूण १२ उमेदवार होते. त्यापैकी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विलास तरे यांना ५३ हजार ७२७ (३८.९५ टक्के ) मते मिळवून ते १३ हजार ७८ मताधिक्याने विजयी झाले होते तर शिवसेनेचे उमेदवार सुनील धानवा यांना दुसºया क्रमांकाची म्हणजे ४० हजार ६४९ (२९.४७ टक्के) मते मिळाली होती तर जनता दलाचे उमेदवार काळूराम धोदडे यांना ७ हजार ३६० (५.३४ टक्के) मते मिळाली तर उर्वरीत आठ उमेदवारांना सर्व मिळून अवघी १८ हजार ९९ मते मिळाली होती. सुतार यांना १८ हजार १०४ मिळालेली मते व तरे यांचे १३ हजार ७८ मतांचे मताधिक्य पाहता सेना व मनसे यांच्यामध्ये झालेल्या मत विभागणीचा फायदा तरे यांना होऊन त्यांनी विजय मिळवला होता. अशा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून युतीला कंबर कसावी लागणार आहे.मात्र २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने पालघर लोकसभेच्या अंतर्गत येणाºया पालघर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार जगन्नाथ वरठा यांना ३१४८ (१.९२ टक्के) मते , बोईसर : वसंत रावते ४५०३ (२.६३ टक्के) मते, डहाणू : विजय वाढीया २०८८ (१.३५ टक्के) मते, विक्र मगड : भरत हजारे ४७४३ (२.८७ टक्के) , नालासोपारा : विजय मांडवकर ३८६० (१.७१ टक्के) तर १३३- वसई : स्वप्नील नर २३२९ (१.२२ टक्के). या सहाही मतदारसंघात मोठ्या उमेदीने व अपेक्षेने मनसे ने उमेदवार रिंगणात उतरवले होते. परंतु त्या निवडणुकीमध्ये मनसेच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला होता सहा उमेदवार मिळून अवघी २० हजार ६७१ एवढी मते मिळाली होती.पालघर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा संघात मनसेच्या सहा उमेदवारांनी २० हजार ६७१ मिळवली होती ही खूप छोटी मतांची संख्या वाटत असली तरी लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीमध्ये पालघरचे खासदार म्हणून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी भाजपाचे चिंतामण वनगा यांचा १२३६० मतांनी पराभव केला होता.२०१९ च्या निवडणूकीत पालघर लोकसभा मतदार संघाची निवडणूक बविआ व महाआघाडी आणि शिवसेना व भाजपा युतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असून ही निवडणूक दोन्ही बाजूने अत्यंत प्रतिष्ठेची केली असल्याने ती अटीतटीची होणार हे निश्चित असून या मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार प्रचंड मताधिक्यानी नाही तर काही हजार मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने मनसेची मिळणारी मत ही बविआ करता बोनस ठरणार आहेत. या संदर्भात मनसे व बविआच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोईसरला बुधवारी (दि.२४) झाली त्या मध्ये राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे बविआ व महाआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असून त्या नुसार मनसेचे पालघर (लोकसभा) जिल्हा प्रमुख कुंदन संखे व पदाधिकारी आणि मनसेच्या सैनिकांच्या जिल्हाभर बैठका होण्यास सुरुवात झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही बविआच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार असून आमचे जिल्ह्यात सुमारे ८ हजार पदाधिकारी व कार्यकर्ते असून जिल्ह्यात आमचे सुमारे ५० ते ६० हजार मतदार आहेत त्याचा फायदा बविआच्या उमेदवाराला होईल-कुंदन संखेपालघर (लोकसभा ) जिल्हा प्रमुख

मनसेचा नक्की पाठींबा कोणाला ?नालासोपारा : मंगळवारी सकाळी गोखीवरे येथील मनसेच्या कार्यालयात हितेंद्र ठाकूर यांना ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पालघरचे कुंदन संख्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन बिनशर्त पाठिंबा दिला.बुधवारी संध्याकाळी वालीव येथील नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या कार्यालयात महायुतीला पाठींबा देणारे श्रमजीवीचे संस्थापक, जनआंदोलन समितीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार विवेक पंडित आल्यावर वसई विरार जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील व मनसेचे माजी नगरसेवक प्रवीण भोईर यांनी पुष्पगुच्छ दिल्याचे फोटो वसईत गुरु वारी व्हायरल झाला.त्यामुळे मनसेचा नक्की पाठींबा बविआला की महायुतीला या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे मनसेची दुटप्पी भूमिका असल्याचीही चर्चाही सध्या वसई तालुक्यात सुरू आहे.विवेक पंडित हे मोठे नेते असून ते बुधवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास माझ्या कार्यालयात वडिलांना व मला भेटायला आले होते. माझे वडील जुने कट्टर शिवसैनिक आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार बविआला पाठिंबा दर्शवून त्यांचा प्रचार करत आहे. मोठे अनेक नेते कार्यालयात येतात. त्यावेळी त्यांना मान देणे गरजेचे असल्याने पुष्पगुच्छ दिला जातो. - प्रफुल पाटील, अपक्ष नगरसेवक व मनसे समर्थक, वसईराज ठाकरेंच्या मनसेचा बविआला पाठिंबा असला तरी वसईच्या मनसेचा महायुतीला पाठींबा- विवेक पंडित,माजी आमदार, वसई

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरMNSमनसे