शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे मिळाला लॅपटॉप; वाहतूक पोलिसांनीही केले सहकार्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 23:41 IST

वाहतूक पोलिसांनीही केले सहकार्य 

वसई : आर्थिक विवंचनेतही केवळ मेहनतीची भाकरी खाणारे आजही आपल्या समाजात सन्मानाने जीवन जगत आहेत. अशीच एक घटना वसईतील ओमनगर भागात दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी घडली असून, प्रामाणिक रिक्षाचालक आणि वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा महागडा लॅपटाॅप त्याला परत मिळाला आहे.

वसई वाहतूक शाखेचे सहाय्यक उपपोलीस निरीक्षक तानजी चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वसईतील रिक्षाचालक रवींद्र मोहिते व वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ओमनगर भागात राहणारे राजेश केशवानी यांना मोहिते यांच्या रिक्षात विसरलेला महागडा लॅपटॉप परत करण्यात यश आले आहे.

वसई रोड स्टेशन परिसरात रिक्षाचालक रवींद्र मोहिते हे रिक्षा चालवून प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करत आहेत  दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी वसई अंबाडी रोड रिक्षा स्टँड येथून राजेश केशवानी हे मोहिते यांच्या रिक्षात बसले व रिक्षात पाठीमागे  आपला लॅपटॉप ठेवून दिला. रिक्षात एक दुसरा प्रवासीही होता. दोघेही प्रवासी ओमनगरमध्ये उतरले. मोहिते पुन्हा स्टेशनवर आले असता रिक्षात पाठीमागे एका बॅगेत लॅपटॉप दिसला. 

मोहिते यांनी वसई वाहतूक शाखेत धाव घेतली. तेथील वाहतूक विभागाचे सउपोनि तानाजी चौगुले व  सउपोनि रवींद्र परब यांना समक्ष भेटून लॅपटॉप जमा केला. दरम्यान, रिक्षाचालक मोहिते यांनी दिलेल्या माहितीआधारे तत्काळ दोघा वाहतूक पोलिसांनी मोहिते यांनी ज्या दोघा प्रवाशांना ओमनगर भागात उतरवले होते तिथे चौकशी केली व काही तासांनी आपले कौशल्य सिद्ध करीत त्या लॅपटॉप मालकाचे घर गाठले. संध्याकाळी राजेश केशवानी यांना वाहतूक शाखेत बोलावून पोलिसांनी ओळख पटवली.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस