शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वसई परिवहन विभागात यंदा २११ कोटींचा महसूल

By admin | Updated: April 9, 2017 01:02 IST

वसई उपप्रादेशिक परिवहन खात्याला वर्षाखेरीस २११ कोटी ५९ लाख रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. मागच्या वर्षी १६१ कोटी ९९ लाखाचा महसूल मिळाला होता.

- शशी करपे,  वसईवसई उपप्रादेशिक परिवहन खात्याला वर्षाखेरीस २११ कोटी ५९ लाख रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. मागच्या वर्षी १६१ कोटी ९९ लाखाचा महसूल मिळाला होता. यंदा ७८ हजार ९६ वाहनांची नोंदणी झाली असून त्यात ४८ हजार ८८६ मोटार सायकलींचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यात आता वाहनांची संख्या ३ लाख ७४ हजार ३१२ इतकी झाली .पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यातील वाहनांची नोंदणी विरार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होते. गेल्या आर्थिक वर्षात (२०१५-१६) कार्यालयात ६५ हजार १०४ वाहनांची नोंदणी होऊन १६१ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा मात्र, परिवहन कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षभरात कार्यालयात ७८ हजार ९६ वाहनांची नोंदणी झाली. त्यातून २११ कोटी ५९ लाख रुपयांचा महसूल मिळाला. गेल्यावर्षी मोटार सायकलींची सर्वाधिक ४८ हजार ८८६ इतकी नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर ९ हजार ९९४ इतक्या स्कूटर नोंदल्या गेल्या आहेत. तर २० परदेशी कंपनीच्या मोटार सायकली नोंदवल्या गेल्या आहेत. मावळत्या वर्षात ९ हजार ८२६ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. त्याचबरोबर ४६ परदेशी बनावटीच्या चारचाकी वाहनांचीही नोंदणी झाली. विशेष म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला ६ एप्रिलला आॅस्टीन मार्टीन या परदेशी कंपनीची २ कोटी ९४ लाख रुपये किंमतीची कार नोंदवली गेली. या कार्यालयात आतापर्यंत सर्वाधिक महागडी गाडी नोंदणीचा हा विक्रम झाला आहे. रिक्षा,मालवाहू वाहनांचीही नोंदणीयावेळी रिक्शा आणि कॅब-टॅक्सींचीही मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली. २ हजार ३४२ रिक्षा आणि २ हजार ३२६ टॅक्सी-कॅब नोंदवल्या गेल्या आहेत. ३ हजार ३४२ हलक्या माल वाहतूक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर १ हजार ९४२ अवजड माल वाहतूक वाहनांची नोंदणी झाली. मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात ६५ हजार १०४ नवी वाहने आली होती. त्यात आता ७८ हजार ०९६ वाहनांची भर पडून जिल््हयातील वाहनांची संख्या ३ लाख ७४ हजार ३१२ इतकी झाली आहे. पालघर जिल्ह्यात वाढत्या शहरीकरणामुळे वाहन खरेदीदारांची संख्या वाढत चालली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.