शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू, तलासरीत कांदळवनांना राखीव वनक्षेत्रांचे कवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:40 IST

दिवसेंदिवस विकासाच्या नावाखाली समुद्र आणि खाडीकिनाऱ्यालगतच्या कांदळवनाला धोका पोहाेचत आहे. त्यामुळे पर्यावरण तसेच जैवविविधतेची मोठी हानी होते.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : दिवसेंदिवस विकासाच्या नावाखाली समुद्र आणि खाडीकिनाऱ्यालगतच्या कांदळवनाला धोका पोहाेचत आहे. त्यामुळे पर्यावरण तसेच जैवविविधतेची मोठी हानी होते. राज्य सरकारने डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ४९४.४६४४ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनाला राखीव वनांचा दर्जा देत वनविभागाकडे सुपूर्द केल्याचे २८ जानेवारीला घोषित केले. या निर्णयाने पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.कांदळवनाच्या हिरव्या भिंतीला धोका पोहाेचल्यास समुद्रकिनारी भागाचे उधाणाच्या लाटा, पुराचा जोर आणि चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे या वनांच्या संरक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी पर्यावरणप्रेमींची होती.  २८ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार मुख्य वनसंरक्षकांनी डहाणूतील वाढवण, वरोर, देदाळे, चिंचणी, वडदे, नरपड आंबेवाडी, चिखले, घोलवड, बोर्डी, डेहणे, सरावली, सावटा, आगवन, आसनगाव, माटगाव, बाडा पोखरण, चंडीगाव, कोलवली आदी गावांतील ४६३.७८४७ हेक्टर क्षेत्र आणि तलासरी तालुक्याच्या झाई या गावचे ३०.६७९७ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४९४.४६४४ हेक्टर क्षेत्र राखीव वने म्हणून घोषित केली आहेत. हा सकारात्मक निर्णय असल्याने त्याचे स्वागत पर्यावरणप्रेमींनी केले आहे.वाढवण समुद्रकिनारी जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजराडहाणू : समुद्रात जाणारे घाण पाणी शुद्ध करण्यास मदत करणाऱ्या, सजीवांसाठी विपुल प्रमाणावर प्राणवायू निर्माण करणाऱ्या, पाणथळ जागेत उगवणाऱ्या तिवरांच्या झाडांचे म्हणजेच कांदळवनाचे रक्षण करण्यासाठी प्रस्ताविक वाढवण बंदर समुद्रकिनाऱ्यावर, जागतिक पाणथळ जागा दिनाचे औचित साधून वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने कांदळवनातील तिवरांच्या झाडांची ओवाळणी करून त्यांची पूजा केली. यावेळी ‘वाढवण बंदर हटवा, कांदळवन वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.  या जागतिक पाणथळ जागा दिनासाठी नारायण पाटील, वैभव वझे, ज्योती मेहेर, रामकृष्ण तांडेल, अनिकेत पाटील, जयप्रकाश भाय, हेमंत पाटील, पौर्णिमा मेहेर, हेमंता तामोरे, विजय विदे, अशोक पाटील, नरेंद्र पाटील आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.  समुद्रकिनाऱ्यावरील पाणथळ जागेतील तिवरांच्या झाडांच्या कांदळवनामुळे समुद्राची धूप तर थांबतेच, शिवाय सजीवांना लागणारा प्राणवायू आणि खाड्यातून समुदात जाणारे घाण पाणी शुद्ध करण्याचे कार्य ही झाडे करत असतात, तसेच झाडांच्या मुळाखाली असणाऱ्या पाणथळ आणि चिखलाच्या जागेत खेकडे निवटी असे अनेक प्रकारचे लहान-मोठे मासे राहत असतात. प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे सरकार ही कांदळवने नष्ट करू पाहात आहे, ही कांदळवने वाचविण्यासाठी जागतिक पाणथळ जागा दिन म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात आला. 

टॅग्स :forestजंगलVasai Virarवसई विरार