शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; पेल्हारने ५५ तर तुळींजने ३५ मोबाईल केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:25 IST

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गहाळ झालेले पेल्हारने ५५ तर तुळींजने ३५ मोबाईल नागरिकांना परत केले आहे.

मंगेश कराळे -नालासोपारा : मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता पेल्हार आणि तुळींज पोलिसांनी खोडून काढली आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गहाळ झालेले पेल्हारने ५५ तर तुळींजने ३५ मोबाईल नागरिकांना परत केले आहे.

पेल्हार आणि तुळींज पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात दाट वस्ती असून आठवडी बाजार, रेल्वे स्टेशन परिसरातून गहाळ झालेल्या मोबाईल बाबत पेल्हार आणि तुळींज पोलिसांना नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार पेल्हार व तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या या मोबाईलचा तपास घेऊन ते शोधून काढले. २६ जानेवारीचे औचित्य साधून पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी आणि  तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या हस्ते रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत केले. हरवलेले मोबाईल फोन मिळण्याची आशा नसता नाही पोलिसांनी ते शोधून त्यांच्या मालकांना पोचून एक अनोखी भेट दिल्याने मोबाईल फोन मालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. 

पेल्हार पोलिसांनी ८ लाख २५ हजार रुपयांचे ५५ मोबाईल तर तुळींज पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीचे ३५ मोबाईल शोधून काढले असून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. पेल्हार आणि तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदारांनी अथक मेहनत करून मोबाईलचा शोध लावला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMobileमोबाइल