शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आवाहनानंतरही लोकांचा चाचणी करण्यास नकार; कोरोनाबाधितांची संख्या वाढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 00:31 IST

आरोग्य यंत्रणेवर दबाव

हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात कोविड-१९ ने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर संशियत रुग्णांनी लवकर चाचणी करून इस्पितळात दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असले तरी आपली चाचणी करण्यास लोक नकार देत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा दबाव वाढत चालला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २३,१२८ इतकी वाढली असून ४७१ रुणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लक्षणे अंगात असतानाही योग्य उपचार न घेता आजार बळावल्यानंतर उपचारासाठी धावाधाव करणाºया अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांचे बहुतांश मृत्यू याच कारणामुळे झाल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. मृत्यू झालेले अनेक रु ग्ण हे कोरोनासदृश आजाराने बाधित झाल्याचे माहिती पुढे येत असताना त्यांच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारादरम्यान अनेक नातेवाईक त्या मृतदेहाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात येत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेकदा कुटुंबियांकडूनच माहिती लपवली जात आहे.

पालघर जिल्ह्यात वसई-विरार महापालिकेत ८ मे रोजी १८९ बाधित रुग्ण आणि ८ मृत्यू असा आकडा होता. ग्रामीण भागात २७ बाधित आणि २ मृत्यू नोंद होते.एका महिन्यानंतर ९ जून रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३०१ तर मृत्यू ४१ होते. वसई-विरार महानगरपालिकेत ६ पटीने रुग्णसंख्या वाढून बाधित रु ग्ण ११०८ तर ३८ मृत्यू झाले. तर ग्रामीणमध्ये ८२ बाधित आणि ३ मृत्यू इतकी संख्या होती. ८ जुलै रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आठ पटीने वाढून ८ हजार १४१ तर मृत्यू १४९ झाले. वसई-विरार महापालिकेत बाधित रुग्ण ६५९९, मृत्यू १३० तर ग्रामीणमध्ये बाधित १७५ आणि मृत्यू १९ अशी संख्या होती. ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या दुप्पटीने वाढून १७ हजार २०० तर मृत्यू ३३९ इतकी झाली होती. महानगरपालिकेत रुग्ण संख्या १६ हजार ०७७ आणि मृत्यू ३४२ तर ग्रामीणमध्ये बाधित ७,०५१ आणि १२९ मृत्यू अशी संख्या वाढली आहे. वसई-विरार महापालिकेने कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यात बºयापैकी यश मिळविल्याचे दिसून आले. आरोग्य यंत्रणेला सक्षम करताना आरोग्य सेवेतील सुमारे १ हजार रिक्त पदे भरताना डॉक्टर, नर्स आदी महत्त्वपूर्ण पदे भरण्याचे काम केले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार १२८ इतकी झालेली आहे. ग्रामीण भागातील ७ तालुक्यातून पालघर तालुका सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला असून ३ हजार ८३३ रु ग्ण बाधित असून ६७ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्यानंतर डहाणू तालुक्यात ९९९ बाधित रु ग्ण तर २१ बाधित रु ग्णांचे मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक कमी संख्या मोखाडा तालुक्यात १०५ बाधित आहेत, तर मृत्यू एकही नाही. लॉकडाऊन उठविल्यानंतर बोईसर, पालघरमधील कारखाने पुन्हा सुरू झाल्याने बाधितांची संख्या वाढली आहे. लोकसंख्येच्या मानाने ग्रामपंचायत क्षेत्रात आरोग्य यंत्रणा आणि सुखसोयीची कमतरता असल्याने बोईसरमध्ये बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.लक्षणे दिसूनही लपवली जाते माहिती : पोलीस बळाचा वापर होणारमार्च-एप्रिलमध्ये कोरोनाबाबत जनतेला समजावून सांगितल्यावर आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांना सहकार्य करीत कोरोना तपासणी आणि विलगीकरणासाठी लोक पुढे येत होते. मात्र सोशल मीडियावरील चुकीच्या मेसेज बरोबरच विलगीकरण कक्षात मिळणारे निकृष्ट जेवण आणि व्यवस्था आदी कारणांमुळे अनेक रुग्ण कोरोनाची लक्षणे दिसूनही ते माहिती दडवून ठेवत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबधितांची संख्या वाढू लागली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेले कुटुंबीय, इतर व्यक्तींची नावे पोलिसांना कळविली जाणार आहेत. लोक आपली चाचणी करून घेण्यास नकार देत आरोग्य कर्मचाºयांना हाकलून देत आहेत. अशा परिस्थितीत आपण काम कसे करायचे? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.जिल्ह्यातील रिक्त पदेजिल्ह्यात एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३१२ उपकेंद्रे आहेत. दररोज साधारणपणे आरोग्य केंद्रात ५० हजार रु ग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी नोंद करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत एकूण १७१२ मंजूर पदापैकी १२१५ पदे भरण्यात आली असून ४९७ पदे रिक्त आहेत. पैकी सहायक जिल्हा अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार