पारोळ : उद्योग तोट्यात दाखवून येथील ओम पाइप कंपनीने १४ स्थानिक कामगारांना कमी केले असून काही दिवसांतच परप्रांतीय मजुरांना कामावर घेऊन कंपनी पुन्हा सुरू केल्याचा प्रकार झाला आहे. या अन्यायाविरोधात या कामगारांनी कंपनीच्या गेटसमोरच आंदोलन सुरू केले आहे.कंपनी प्रशासनाने ७ जुलै २०१५ पासून कोणतीही नोटीस न देता या कामगारांना कमी करण्यात आले आहे. असे करून कंपनी बंद करण्याचे नाटक करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच ओडिशा राज्यातून कामगार बोलवून कंपनीचे काम चालू केले. गत सहा वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांनी या अन्यायाविरोधात आम्हालाही कामावर ठेवा, अशी मागणी केली असता कंपनी त्या मागणीला केराची टोपली दाखवत त्यांना वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कामगारांना न्याय मिळावा, म्हणून मार्क्सवादी गोदाताई परुळेकर मंचने कामगारांना सोबत घेऊन आंदोलन छेडले आहे. (वार्ताहर)
स्थानिकांना वगळून परप्रांतीयांची भरती
By admin | Updated: January 5, 2016 00:54 IST