शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिका हद्दीत रेकॉर्ड ब्रेक वाढ; 303 रूग्ण कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 22:59 IST

वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 303 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

- आशिष राणे

वसई : वसई -विरार शहरात रविवारी सर्वाधिक रेकोर्ड ब्रेक 303 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले असून शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 3 हजार 550 वर पोहचली आहे, तर दिवसभरात 72 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

दरम्यान रविवारी  वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 303 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई-  81 नायगाव -17  वसई-विरार- 22 नालासोपारा-143 आणि विरार-  40  अशा एकूण 303 रुग्णाचा अंतर्भाव आहे. तर पालिका हद्दीत रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 105 इतकी झाली आहे . तर आतापर्यंत शहरात विविध रुग्णालयात एकूण 1741 रुग्ण कोरोना वर उपचार घेत आहेत.

एकूणच शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने  ही बाब पालिकेच्या दृष्टीने महाचिंतेची बनून राहिली आहे.

दिलासादायक! वसई विरार शहरात 72  रूग्ण घरी परतले 

वसई विरार मनपा हद्दीत रविवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 72 रूग्ण आपापल्या घरी परतले त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 1704 वर पोहचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र