विरार : वाणगाव आणि घोलवड रेल्वे उड्डाणपूलाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने पुलाच्या खर्चाची जबाबदारी घेतली असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आलेली आहे. रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लागल्यानंतर शेकडो गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.वाणगाव आणि घोलवड रेल्वे स्टेशनवर रेल्वे उड्डाणपूल नसल्याने शेकडो गावातील गावकऱ्यांना पूर्व-पश्चिमेला ये-जा करण्यास त्रासदायक होत होते. आमदार आनंद ठाकूर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने गेल्या वर्षी दोन्ही उड्डाणपूलाला मान्यता दिली होती. मात्र, निधी नसल्याने रेल्वेकडून पुढील हालचाली होत नव्हत्या.आमदार ठाकूर यांनी उड्डाणपूलासाठी निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरला होता. राज्य सरकारने उड्डाणपूल बांधण्यास तयारी दाखवून अर्थसंकल्पात वाणगावसाठी ५७ कोटी रुपये आणि घोलवडसाठी ४९ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. उड्डाणपूल बांधकामाची लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होऊन कामाला गती मिळेल, अशी माहिती आमदार ठाकूर यांनी दिली.
वाणगाव, घोलवड रेल्वे उड्डाणपूलाला मान्यता
By admin | Updated: April 10, 2016 00:51 IST