शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसईहून थेट गाठा कोकण, पश्चिम रेल्वे उभारणार नवीन कोचिंग टर्मिनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:07 IST

Vasai Railway Station: पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे आठवे टर्मिनस ठरणार असून, यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहेत.

- महेश कोले

मुंबई -  पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे आठवे टर्मिनस ठरणार असून, यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पासाठी १५० कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या २०२३-२४ या वर्षातील वाहतूक सुविधा अंतर्गत नवीन प्रकल्पांसाठी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वसई रोड येथील नवीन टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. आता मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच इंजिनियरिंग स्केल प्लॅन तयार केला जाईल.  

तीन मार्गिका असणारनवीन टर्मिनसमध्ये टर्मिनसवर तीन मार्गिका असतील आणि येथून फक्त मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म रिटर्न ट्रेनसाठी एक आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधला जाणार आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना ट्रेन उभ्या करण्याची सोय असेल,  उर्वरित मार्गिकेवर ट्रेन पार्किंगची व्यवस्था असेल.  नवीन टर्मिनस सुरू झाल्यावर आणखी १२ अतिरिक्त मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवण्याची क्षमता वाढणार आहे.  

वसई रोड येथे नवीन कोचिंग टर्मिनस विकसित करण्याची योजना त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. रेल्वे बोर्डाने अलीकडेच या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारkonkanकोकण