शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोकणात गणपतीसाठी जाण्याचे दर गगनाला भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:29 IST

रेल्वे, एस.टी. बंद : प्रतिव्यक्ती दोन-अडीच हजार रुपये, चाकरमानी त्रस्त

नालासोपारा : वसई-विरारमधील हजारोच्या संख्येने कोकणातील चाकरमानी राहतात. हे चाकरमानी आराध्य दैवत असलेल्या गणपती उत्सवासाठी कोकणात जातात, मात्र या वेळी कोरोनाचे मोठे संकट असल्याने लॉकडाऊनमुळे ट्रेन, एस.टी. बंद आहेत. या फायदा ट्रॅव्हल्सवाल्यांनी उठवला असून तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत. एका व्यक्तीकडून दोन ते अडीच हजार रुपये तिकिटांसाठी आकारले जात असल्यामुळे चाकरमानी त्रस्त झाले आहेत.

मुंबई आणि उपनगरांतील शहरांतून दरवर्षी लाखो प्रवासी गणपती उत्सवासाठी कोकणात जातात. पण, या वर्षी त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागणार आहे. खाजगी बससेवा चालवणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी सणासुदीच्या काळात आपले दर अव्वाच्या सव्वा वाढविल्याने नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यांच्या भाडे आकारणीवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याने प्रवाशांची लूट सुरू आहे. ज्यांचे स्वत:चे वाहन असेल तर ई-पास काढण्याची अट राज्य सरकारने घातलेली आहे, तर ज्यांच्याकडे स्वत:ची वाहने नाहीत, त्यांना खाजगी ट्रॅव्हल्समधून गाव गाठून गणपती उत्सव साजरा करायचा आहे. या होणाºया गर्दीमुळे चाकरमान्यांचे हाल होत असून काहींना तिकीट सुद्धा मिळत नसल्याने गावाला जाण्यास मुकावे लागणार आहे. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट गाड्या प्रवाशांची लूट करत आहे.गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या सणात मुंबई आणि उपनगरातील शहरातून रहिवासी उत्सवासाठी आपल्या गावी जातातच. पण सध्या कोरोना वातावणामुळे शासनाने लावलेल्या अटी-शर्तीने ही संख्या घटली असली तरी अजूनही काही लोक गावी जात आहेत. पण त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागत आहे. आधीच कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडले असता केवळ प्रवासासाठी एका प्रवाशाला दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. आधी हेच भाडे केवळ पाचशे ते सातशे रु पये होते. पण आता दर ट्रॅव्हल्सवाल्यांनी दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ट्रॅव्हल्सवाले कोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीमुळे व्यवसायात मोठा तोटा झाल्याचे कारण सांगत भाडेवाढ केल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि शासकीय बससेवा नसल्याने नागरिकांना खाजगी बससेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. इतकेच नाही तर येथून गावी गेल्यावर त्यांना १४ दिवस अलगीकरणात राहावे लागणार आहे. वाढलेले प्रवास दर सामान्यांना परवडत नसतानाही त्यांना नाइलाजाने पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे शासनाने शासकीय प्रवास सेवा गणपतीसाठी निदान सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ई-पासेस आॅनलाइन मिळणार सांगितले जाते, पण ते अद्याप मिळत नाहीत. कागदपत्रांची पूर्तता करूनही वेटिंग म्हणून मेसेज येत आहे. अव्वाच्या सव्वा पैसे दिले की, हेच ई-पासेस एजंट लोकांना कसे काय मिळतात?- सचिन निवळकर, संतप्त प्रवासी

कोरोनामुळे तीन महिन्यांपासून कामावर नाही आणि गावी जाण्यासाठी ट्रेन किंवा बसेसची सुविधाही नाही. ई-पासेससाठीही हजारो रु पये मोजावे लागत आहे. त्यातच खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी दोन हजार ते अडीच हजार एकाचे तिकीट केले आहे. यामुळे हिरमोड झाला आहे.- प्रथमेश गोगरकर, संतप्त प्रवासी

शासनाने आम्हाला केवळ २१ प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली आहे. त्यातही प्रवाशांचे परमिट, ई-पास, डिझेलचा खर्च, चालकाचा पगार या सर्व बाबींवरचा खर्च वाढला आहे. तर येताना बस रिकामी आणावी लागत असल्याने मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर नियमात कर भरावे लागणार आहेत.- बाजीराव दुखते, ट्रॅव्हल्स व्यावसायिक 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीrailwayरेल्वे