डहाणू/बोर्डी : बोर्डी गावातील अल्पवयीन आदिवासी मुलीला धमकावून तिच्यावर मार्च ते आॅगस्ट या कालावधीत बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना घोलवड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने सदर बाब पुढे आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी घोलवड पोलिसात तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे.घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत बोर्डी गावातील पंधरा वर्षीय आदिवासी मुलीवर पाच महन्यांपासून बलात्कार होत होता. ती पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी नातेवाइकांनी घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपी पस्तीस आणि पंचेचाळीस वयोगटातील असून बोर्डी गावातील आदिवासी समाजातील आहेत. आरोपींनी मार्च महिन्यात पीडितेवर तिच्या घरी जाऊन बलात्कार केला होता. वाच्यता केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोन्ही आरोपी मासेमारी बोटीवर खलाशाचे काम करतात. सुट्टी घेऊन बोर्डी येथे आल्यानंतर पीडितेला धमकावून ते अत्याचार करीत होते. (वार्ताहर)डीएनए तपासणी सुरुदोन्ही आरोपींची डीएनए तपासणी पूर्ण झाली आहे. पीडित अल्पवयीन व गर्भवती असल्याने तिची डीएनए चाचणी मुंबईस्थित जेजे रुग्णालयात करण्यात येणार आहे. घोलवड पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक गावीत प्रभारी अधिकारी दुर्गेश शेलार तपास करीत आहे.
बलात्कारीता गर्भवती ; दोन अटकेत
By admin | Updated: September 28, 2016 02:55 IST