राजू शेट्टींचा रेल रोको फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:48 AM2018-07-19T04:48:09+5:302018-07-19T04:48:18+5:30

गुजरात व कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी घोषणा देऊन आज डहाणू रेल्वे स्थानकात खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद पॅसेंजरला अडविले

Raju Shetti's rail roko failed | राजू शेट्टींचा रेल रोको फसला

राजू शेट्टींचा रेल रोको फसला

Next

- शौकत शेख 
डहाणू : गुजरात व कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी घोषणा देऊन आज डहाणू रेल्वे स्थानकात खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद पॅसेंजरला अडविले, मात्र त्या रेल्वेला दुधाचे डबे जोडलेले नसल्याने त्यांची निराशा झाली व त्यांनी आपला रेल रोको संपविला. त्यामुळे ही ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या वेळी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर राजू शेट्टी यांनी सांगितले की, सरकारने आमच्या आंदोलनाचा धसका घेऊन गुजरातहून मुंबईला रेल्वे मार्गे येणारे दूध पाठवले नाही; परंतु आमचे आंदोलन सुरूच राहील़
अहमदाबाद - मुंबई सेंट्रल पॅसेंजरने गुजरातवरून चार लाख लीटर दूध मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती काल रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती.

Web Title: Raju Shetti's rail roko failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.