शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजे परमार ‘पालघर श्री’चा मानकरी, योगेश मेहेर दिव्यांगात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 23:54 IST

एकूण आठ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील मानाचा ‘मॅन फिजिक्स पालघर श्री २०२०’ हा किताब बी फिटच्या राजे परमार याने पटकावला.

नालासोपारा : पालघर आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स फिटनेस असोसिएशन, रांगडे जिम्नॅशिअम आणि बहुजन विकास आघाडी (युवा आघाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात नुकतीच राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा झाली होती. एकूण आठ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील मानाचा ‘मॅन फिजिक्स पालघर श्री २०२०’ हा किताब बी फिटच्या राजे परमार याने पटकावला.‘मास्टर पालघर श्री’चा किताब भांबले जिमच्या चिराग पाटील याने जिंकला. दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंच्या गटात योगेश मेहेर (टोटल फिटनेस) हा दिव्यांग ‘पालघर श्री’चा मानकरी ठरला. तर सुधाकर पवार (फिनिक्स जीम), मीता घुरघूस (भावर जिम), राहूल म्हात्रे (रांगडे जिम), विनायक जाधव (रॉयल फिटनेस), हर्षल वैती (सुनिल जिम), राजे परमार (बी फिटनेस), योगेश मेहेर (टोटल फिटनेस), चिराग पाटील (भांबले जिम) या शरीरसौष्ठवपटूंनी आपापल्या गटातील विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीची ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आ. क्षितीज ठाकूर, युवा आघाडी प्रमुख सिद्धार्थ ठाकूर, प्रभाग समिती सभापती निलेश देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश रोडे, युवाचे नालासोपारा अध्यक्ष पंकज देशमुख, माजी नगरसेवक अ‍ॅड.रमाकांत वाघचौडे, परेश पाटील, बन्सनारायण मिश्रा आदी मान्यवरांनी या स्पधेर्ला भेट दिली.आ. क्षितीज ठाकूर यांनी स्पर्धा आयोजक आणि स्पर्धकांचे कौतुक केले तसेच शुभेच्छाही दिल्या. युवा आघाडीचे पदाधिकारी किशोर काकडे, माजी नगरसेवक किरण काकडे यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा भरविली होती.

टॅग्स :palgharपालघरbodybuildingशरीरसौष्ठव