शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या लग्नवारीने कोरोना रुग्णांमध्ये वाढ, आणखी २२ जण बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:29 IST

जयपूर येथे विमानाने  गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते.

पालघर : पालघर पूर्वेकडील बिल्डर कीर्ती बाफना यांच्या मुलाच्या लग्नासाठीराजस्थानमधील जयपूर येथे विमानाने  गेलेल्या वऱ्हाड्यांच्या बाधित संख्येत वाढ झाली आहे. या वऱ्हाड्यांपैकी  एकूण २२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.जयपूर येथे विमानाने  गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वर पित्याला सर्व वऱ्हाड्यांची कोरोना तपासणी करून घेण्याच्या आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. पालघर तालुक्यातील डॉक्टर, वकील, बिल्डर, कारखानदार, मोठे व्यावसायिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदी १८० हून अधिक जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. विवाह आटोपून हे सर्व जण  १० मार्च रोजी  पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना कोरोना बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे उर्वरित सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानुसार १३ मार्च रोजी ४७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ७ जणाना संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे, तर दि. १५ मार्च रोजी ५६ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये १२ जणांना लागण झाल्याचा अहवाल आला आहे. या लग्नकार्यात उपस्थित असलेल्यांपैकी एकूण २२ जण बाधित आढळले आहेत. 

कुटुंबीयांचीही चाचणी राजस्थानला लग्नासाठी गेलेल्या उर्वरित ७७ जणांची आणि पॉझिटिव्ह आलेल्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, बाधित आलेल्यांच्या नातलगांनी विवाह समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानmarriageलग्न