शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
5
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
6
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
7
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
8
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
9
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
10
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
11
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
12
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
13
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
14
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
15
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
16
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
17
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
18
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
20
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:29 IST

बहुतांश शाळांना जाहीर केली सुटी, सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल, वाहतूकही झाली ठप्प

- हितेन नाईक पालघर : आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यासह वसई, विरार, नालासोपारा भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १५७.१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शनिवारी दुपारी १ वाजता सूर्या प्रकल्पाच्या धामणी व कवडास या दोन धरणातून ४२ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात १ जून ते ३ आॅगस्ट पर्यंत एकूण १४ हजार ८९९.३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वसई तालुक्यात १३१ मिमी,जव्हार १८३.५ मिमी,विक्र मगड १२५.५ मिमी, मोखाडा १३० मिमी, वाडा १३१ मिमी, डहाणू १७७.९४ मिमी, पालघर सर्वाधिक २३८.३३ मिमी, तलासरी १४० मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्व तालुक्यातील नदी, नाले, खाड्या, दुथडी भरून वाहत असल्याने तालुका व गावांचा संपर्कतुटला आहे.शनिवारी सकाळपासून विक्र मगड-जव्हार, मनोर-विक्रमगड, डहाणू-विक्रमगड,मनोर--वाडा तसेच पालघर - बोईसर, सफाळा--पालघर, मनोर-- पालघर या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. जी मुले शाळेत पोहचली होती त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहचवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.धरणे, नद्या ओव्हर फ्लोजिल्ह्यातील महत्वाचे समजले जाणारे सर्वच लघु पाटबंधारे सततच्या पावसाने संपूर्ण भरले असून ओव्हर फ्लो झाले आहेत. मासवणची सूर्या नदी ७.१० मीटर पातळी पर्यंत,वैतरणा नदीने धोक्याच्या इशाºयाची १०१.०७ मीटरची पातळी गाठली आहे. तर पिंजाळ नदी नेही १०२.७५ मीटरची पातळी गाठली आहे. शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत असल्याने या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भातशेतीसह पीक लागवडीला धोकामागील आठ दिवसांपासून सततच्या पावसाने भातशेती पाण्याखाली असल्याने तालुक्यातील भातपीक कुजण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावर भात, नागली, वरई, तूर, उडीद पिकांची लागवड करण्यात आली आहे. वसई तालुक्यात ११० हेक्टर, पालघर २००, डहाणू १५०, तलासरी ७०, वाडा ५०, जव्हार २००, विक्रमगड २००,मोखाडा १०० हेक्टर भागात पीक लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. अशावेळी हा पाऊस असाच सुरू राहिल्यास पिके कुजून हातचे पीक निघून जाण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे.बाजारपेठेत पसरला शुकशुकाटविक्रमगड : तालुक्यात गेल्या तीन दिवसात वादळी वाºयासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे अनेक गावांचा विक्रमगड मुख्यालयाशी असलेला संपर्क तीन दिवसांपासून तुटल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारजारपेठेतही शुकशुकाट पसरलेला आहे.शुक्रवारी सायंकाळपासूनच विक्र मगड - जव्हार मार्गावरील साखरा पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि जव्हारचा संपर्क काही काळ तुटला होता. तसेच विक्र मगड-डहाणू रस्त्यावरील तांबाडी नदी, नागझरी बंधारा, विक्र मगडचा ओव्हळ, छोटे-मोठे पुल, बंधारे काही वेळ पाण्याखाली गेले होते. तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारे व मुँहू खुर्द लघु पाटबंधारे तीन दिवसाच्या पावसाने ओव्हर फ्लो झाले आहेत.दरम्यान, विक्र मगड तहसील कार्यालयात विक्र मगड सर्कल २५६ मिलीमीटर तर तलवाडा सर्कलमध्ये २८५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सततच्या पावसाने भातशेती पाण्याखाली असल्याने पिके कुजण्याची भीती आहे.विक्रमगडची तब्बल १५ तास बत्ती गुलविक्रमगड : तालुका व परिसरात सतत होणाºया विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात गेल्या आठवडाभरापासून दिवसभर व रात्रीही बत्ती गुल होत असल्यामुळे नागरिकांचे व त्यावर अवलंबून असणाºया व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत.पावसाळा सुरु झाल्यापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यातच शुक्र वारी रात्री १.०० वाजता वीज गायब झाली ती शनिवारी सायंकाळी ४ पर्यंत म्हणजे १५ तास झाली तरी सुरळीत झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. तीन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने वारंवार केबल, तारा तुटणे, पोल पडणे, मनोर-पालघर येथे बिघाड झाला आहे अशी कारणे येथील महावितरण कार्यालयातून ग्राहकांना मिळत आहेत.या समस्येबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मनोर उपकेंद्रामधील ब्रेकरची समस्या असल्याने विजेची समस्या निर्माण झाली आहे. लवकरच वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, अशी माहिती तेथील अधिकाºयांनी दिली.वाढवणच्या समुद्रात बोट अडकलीडहाणू : वाढवण गावाच्या समुद्रात शंखोदर परिसरातील खडकात सूरतची नंदअपर्णा मालवाहक बोट मुंबई बंदरात माल उतरवून सूरतकडे परतत असताना वादळीवारे आणि तुफान पावसामुळे भरकटल्याने ती खोल समुद्रात शंखोदर परिसरात खडकावर अडकून पडली. तिला असलेल्या दोन पंख्यापैकी एक पंखा खडकामुळे तुटला असल्याचे समजते.ही प्रचंड बोट वाढवणच्या समुद्रात आल्याचे येथील लोकांनी पहाटेच पाहिल्या नंतर त्यांनी वाणगाव पोलिसांना पाचारण केले. बोटीला पाहण्यासाठी वाढवण आणि वरोर गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. सुरूवातीला यात दहशतवादी असल्याच्या भीतीने येथील नागरिकांची धावपळ उडाली. मात्र ती मालवाहक बोट मुंबई बंदरात माल उतरवून सूरतकडे परतत असताना, ती भरकटल्याने खडकात अडकून पडल्याने निदर्शनास येताच,त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.वसई, विरारला झोडपून काढलेनालासोपारा : मागील ४ ते ५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवार सायंकाळपासून जोरदार बॅटिंग करून वसई, विरार, नालासोपारा या परिसराला अक्षरश: झोडपून काढले. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.शुक्र वारी सकाळपासूनच अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु च होती. तालुक्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने धो-धो पावसामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूकही संथगतीने सुरु होती. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नालासोपारा शहरात पूर्वेकडील गालानगर, अलकापुरी, सेंट्रल पार्क, आचोळे रोड, तुळींज रोड, प्रगती नगर, आचोळे रोड या परिसरात पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. तसेच वसई, विरार आणि नायगाव परिसरातील सखल भागात पाणी साचले होते.तुळींज रस्त्यावरील पुलाच्या बाजूने असलेल्या दुकानांमध्येही शनिवारी दुपारपासूनच पावसाचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती. नालासोपारा पश्चिमेकडील हनुमाननगर, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, एसटी डेपो रोड, समेळ पाडा, चक्र ेश्वर तलाव, सोपारा गावातील काही परिसरात, गास, सनिसटी रस्ता, उमराळे, नाळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते.