शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

वसई-विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी, सखल भागात साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 00:51 IST

वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली.

वसई : संपूर्ण जून महिन्यात वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही चिंतेत असताना शुक्रवारी रात्रीपासून सुरूझालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत संततधार लावली आहे. शनिवारी दिवसभर तसेच रविवारीही पावसाने वादळी वाºयासह चांगलीच हजेरी लावल्याने वसई-विरार परिसरात काही ठिकाणी झाडे कोसळली, तसेच इमारतींवरील शेड, होर्डिंग्जही कोसळल्याच्या घटना घडल्या. वसई आणि नालासोपारा शहरांतील सखल भागांत बहुतेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली. वसई-विरार शहर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेल्या झाडांना बाजूला सारून रस्ते वाहतूक सुरळीत केली. तसेच वसई रोड स्टेशनलगत काही इमारतींच्या टेरेसवर असलेल्या शेड व पत्रे उडून खाली पडले. यात खूप नुकसान झाले आहे तसेच आनंद नगर येथील एक लोखंडी कमान होर्डिंग शनिवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावर पडली, मात्र कोणत्याही घटनेत जीवितहानी झाली नाही.वसई तालुक्यात दिवसभरात १०० हून अधिक मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. तसेच पेल्हार धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. थोड्या पावसात जलमय होण्यासाठी ओळखल्या जाणाºया नालासोपारा पूर्वेला सेंट्रल पार्क, तुळिंज रस्ता, महेश पार्क, गालानगर तर वसईतील नवघर-माणिकपूर शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराच्या वेगवेगळ्या सखल भागात रस्त्यावर पाणी साचले. गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने त्यातून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत होते. पहिल्याच पावसात ही स्थिती होत असेल तर पुढे मुसळधार पावसात काय होईल, असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे.पश्चिमेला पालिका कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यांवरही पाणी होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पहिला पावसातच गटारे तुंबल्याने तात्काळ पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस