शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठी उद्घोषणेच्या मुद्द्यावर रेल्वे स्टेशन मास्तरची मुजोरी; तरुणाला डांबून ठेवायला सांगितले, आरपीएफ अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:17 IST

मॅन्युअली उद्घोषणा मराठी भाषेतून न दिल्यास भाईंदर येथील जिगर पाटील हे स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन तक्रार करतात. ३० डिसेंबरला  भाईंदर स्थानकात मराठीतून उद्घोषणा झाली नव्हती.

मीरा रोड : रेल्वेस्थानकावर उद्घोषणा करताना मराठी भाषेचा वापर होत नसल्याची नेहमी तक्रारी करतो म्हणून एका मराठी तरुणास जेलमध्ये टाकण्यास भाईंदरच्या रेल्वे स्टेशन मास्तरने आरपीएफला बजावले. मात्र आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या या तरुणास जेलमध्ये टाकता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली.  या घटनेने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मराठी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

 मॅन्युअली उद्घोषणा मराठी भाषेतून न दिल्यास भाईंदर येथील जिगर पाटील हे स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन तक्रार करतात. ३० डिसेंबरला  भाईंदर स्थानकात मराठीतून उद्घोषणा झाली नव्हती. त्यामुळे  ते या स्थानकातील स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन विपिन सिंह या स्टेशन मास्तरांकडे मराठीत उद्घोषणा झाली नसल्याची तक्रार करत तक्रार वही मागितली होती. दरम्यान, या बाबत सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.   

मराठी एकीकरण समितीने विचारला जाब स्टेशन मास्तरने मराठी तरुणाशी केलेल्या कथित मुजोरीनंतर मराठी एकीकरण समितीचे प्रमोद पार्टे, प्रवीण भोसले, नाना खुणे, महेश पवार आदी रेल्वेस्थानकात पोहोचले. त्यांनीदेखील स्टेशन मास्टर विपिन सिंह यांना कारवाईचा जाब विचारत निषेध व्यक्त केला. 

विनातिकीट प्रवास केला म्हणून दंड आकारलाआरपीएफचे अधिकारी हे जिगर याला घेऊन त्यांच्या पोलिस ठाण्यात गेले असता तेथे त्यांनी विचारणा केल्यावर जिगर मराठी उद्घोषणेबाबतचा प्रकार सांगितला. आरपीएफ अधिकाऱ्यांनी जिगरला पुन्हा स्टेशन मास्तरकडे नेले. आरपीएक कारवाई करत नाही म्हणून तिकीट नसल्याच्या कारवाईसाठी सिंह यांनी  रेल्वेस्थानकातून ‘टीसी’ला बोलावले. विनातिकीट म्हणून जिगरकडून दंड आकारला.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Announcement Dispute: Station Master's High-handedness, RPF Refuses Illegal Detention

Web Summary : A Bhayandar station master ordered the detention of a youth for complaining about the lack of Marathi announcements. RPF refused. Marathi groups protested the station master's actions, leading to fines for ticketless travel.
टॅग्स :Vasai Virarवसई विरारIndian Railwayभारतीय रेल्वे