Provide water for the rabbis; करणार Use of irrigation projects | रब्बीसाठी धरणांचे पाणी देणार; २३ पाटबंधारे प्रकल्पांचा करणार वापर
रब्बीसाठी धरणांचे पाणी देणार; २३ पाटबंधारे प्रकल्पांचा करणार वापर

- सुरेश लोखंडे

ठाणे : अतिवृष्टी, पूरस्थिती आणि आता अवकाळी पावसामुळे हाती आलेला शेतमाल वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाचा लाभ झाला नाही. शेतकऱ्यांनी हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा रब्बी हंगामावर भर देण्यात येत आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील २३ पाटबंधारे प्रकल्पांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांनी या पाणीपुरवठ्याची मागणी तत्काळ नोंदवणे अपेक्षित आहे.

ठाणे जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकºयांच्या ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील भात, नागली व वरी आदी प्रमुख पिके हाती आली असता, अवकाळी पावसाने ती नष्ट केली. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ५० हजार शेतकºयांचे शेकडो हेक्टरचे पीक अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यांत अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यात पीक वाहून गेले. जे काय थोडेफार राहिले, त्यातील पीक आॅक्टोबर, नोव्हेंबरच्या अवेळी पावसामुळे खराब झाले. यंदाच्या खरीप हंगामाचा लाभ शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यावर मात करून रब्बी हंगाम घेण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. ठाणे जिल्ह्यात १६ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकºयांनी तयारी केली आहे.

ठाणे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी एक हजार १०० क्ंिवटल हरभरा, भाजीपाला ७५० एकर आणि मका १३ हजार किलो आणि भुईमूग आदींच्या बियाण्यांचे वाटप केले जात आहे. जमिनीतील ओलावा आणि पडणाºया थंडीचा फायदा या रब्बी हंगामास होणार आहे. यामुळे अवकाळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भर या रब्बी उत्पादनांद्वारे काढता येणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनास अनुसरून पाटबंधारे विभागानेदेखील त्यांच्या नियंत्रणातील पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी शेतकºयांनी तत्काळ त्यांच्या शेतीस लागणाºया पाणीपुरवठ्याची मागणी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील २३ पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणी सोडण्यात येत आहे.

ज्वारी, बाजरी, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला घेण्याची अपेक्षा
आतापासून ३१ मार्चपर्यंत रब्बी हंगामासाठी बंधाºयांसह धरणांतून पाणी सोडले जाणार आहे. या पाणीपुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी पाणी मागणीचा अर्ज तत्काळ भरण्याची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील खराडे, आदिवली, वेल्होळी, डोळखांब, मुसई, जांभे प्रकल्पांतून पाणी सोडण्यात येणार आहे. मुरबाड तालुक्यामधील खांडपे, शिरोशी येथील केटीबी, जांभुर्डे, मानिवली, ठाकूरवाडी आदी धरणांतून पुरवठा होणार आहे.
शेतीसाठी होणारा हा पाणीपुरवठा उपसापद्धतीसह पाणी प्रवाही असलेल्या बंधाºयाच्या प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. भिवंडीमधील उसगाव, अंबरनाथचे जांभिवली, कल्याणच्या टिटवाळा येथील केटीबी बंधारा, उल्हास नदी आणि उपसा सिंचन आदी धरणे व बंधाºयातून शेतीला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या खोच धरणातून, वाडा तालुक्याच्या डोंगस्ते, सिंधीपाडा, पाली केटीबी, जव्हारमधील वाडा केटीबी बंधारा आणि वसईमधील हत्तीपाडा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे यंदा निश्चित केले आहे. शेतकºयांनी शेतीची तयारी करून पाणीपुरवठा सुरू होण्याआधी दुरुस्ती करण्याची गरज आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब कारणी लागेल, यादृष्टीने शेतीसाठी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय होणार नसल्याची खात्री करणे अपेक्षित आहे. याशिवाय, १२० दिवसांत येणाºया भातपिकासह ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, भुईमूग, कडधान्य, तेलबिया आणि भाजीपाला घेण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Provide water for the rabbis; करणार Use of irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.