शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोपाऱ्यात हिंदुत्ववाद्यांनी घेतली वैभव राऊत समर्थनार्थ सभा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 04:00 IST

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांची सरेआम कत्तल होत आहे. त्याच बरोबर बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्याही वाढत चालल्या आहेत.

वसई  - राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांची सरेआम कत्तल होत आहे. त्याच बरोबर बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्याही वाढत चालल्या आहेत. या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी रविवारी नालासोपारा शहरात हिंदु गोवंश रक्षा समिती व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. तिला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थीत होते. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गोरक्ष कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या वैभव राऊत याला महाराष्ट्र दहशतवादी पथकाकडून अटक झाल्यामुळे नालासोपारा शहर प्रकाशझोतात आले आहे. वैभवला एटीएसने त्याच्या घरातून अटक करतांना बॉम्ब व विस्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. मात्र एटीएसची हि कारवाई बोगस असल्याचा दावा करून तिचा निषेध करीत वैभवला समर्थन देणाºया विविध संघटनांनी याअगोदर १७ आॅगस्टला दहा हजारांहून अधिक लोकांचा मोर्चा काढून नालासोपारा हादरवून सोडले होते. ९ सप्टेंबर रोजी त्याला समर्थन देणा-या विविध संघटनांनी सोपा-रा गावात जाहिर जनसंवाद सभेचे आयोजन केले होते.|हिदुत्ववाद्यांवरील आरोपा विरोधात विविध संघटनांनी यावेळी हजेरी लावली होती. वैभवच्या अटकेनंतर पुन्हा नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांच्या हत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत चाललेली संख्या ,धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांचे प्रकार यांचे प्रमाण वाढत असतांना पोलीस आणि प्रशासनकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदू धर्मीय यांवरील या आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, यासाठी रविवार संध्याकाळी नालासोपारा पश्चिम येथील पाटणकर मार्गावरील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर हिंदु गोवंश रक्षा समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या सभेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, शहर चिटणीस मनोज बारोट आदि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार