शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:14 IST

 पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शुक्र वार, २८ सप्टेंबर रोजी थर्मल पॉवर स्टेशनच्या सभागृहात झाला. यावेळी तालुकास्तरीय अकरा आणि राज्य व जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षकांना गौरविण्यात आले.

डहाणू/बोर्डी  - पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शुक्र वार, २८ सप्टेंबर रोजी थर्मल पॉवर स्टेशनच्या सभागृहात झाला. यावेळी तालुकास्तरीय अकरा आणि राज्य व जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षकांना गौरविण्यात आले.दरम्यान जिल्हास्तरीय पेक्षा तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन सरस झाल्याचे सांगून जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या व्यवस्थापन पद्धतीवर टीका करून, २००५ नंतर सेवेत रुजू कर्मचार्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळविण्यासह शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन, पुरस्कार प्राप्त व उपस्थित शिक्षकांचे खासदार राजेंद्र गावित यांनी अभिनंदन केले. शिवाय शिक्षकांनी व्यसनमुक्त व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.त्यानंतर लितका बिपीन राऊत (बोर्डी केंद्र, तलईपाडा), मंगला भूपेंद्र हाडळ (चिखले, वडकती), स्मिता जयेश माळी (मल्याण, वडकून पाटीलपाडा), वैशाली अनिल मोरे (पळे, गावठण), संदीप भालचंद्र म्हात्रे(चिंचणी, तणाशी), ज्युलिना कमा काकड (आशागड, आसवे सावरपाडा), अशोक निवृत्ती तळेकर(गंजाड, दळवीपाडा), अनिता बापू महाकाळ (कासा), राजेश लक्ष्मण बोरसा (चारोटी, बसवतपाडा), महादू रडका लहांगे (दापचारी) आणि रमेश धर्मा वाघदडा (सायवन, वाघातपाडा) या अकरा शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. तर तालुक्यातील राज्य पुरस्कार विजेत्या स्मिता विकास पाटील(वाणगाव, ज. म. ठाकूर विद्यालय) तसेच जिल्हा पुरस्कार विजेते दीपक देसले(घोलवड, टोकेपाडा) यांनाही शाल-श्रीफळ, रोपटे व ग्रंथ, सन्मानचिन्ह देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.पुरस्काराची नोंद सेवा पुस्तिकेत होणे आवश्यक आहे असे मत संदीप म्हात्रे यांनी मांडले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTeacherशिक्षक