शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाइक अ‍ॅम्ब्युलन्स ठरतेय वरदान, २ महिन्यांत ७५ रुग्णांना मिळाले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 06:02 IST

योजना ठरली वरदान : जव्हार तालुक्यात दोन महिन्यात

हुसेन मेमन 

जव्हार : आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात सुरू केलेल्या बाईक अ‍ॅम्ब्युलन्समुळे या तालुक्यातील ७५ रुग्णांचे प्राण वाचले आहे. ही सेवा सेवा पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागाकरीता उपलब्ध करून दिली आहे. दुर्गम भागात तातडीने रूग्णसेवा मिळण्यासाठी याचा फायदा येथील रूग्णांना होत असून अवघ्या दोन महिन्यात जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने ७५ विविध रूग्णांची मदत केली तर पालघर जिल्ह्यात २५० रूग्णांना मदत केलेली असल्याची माहिती १०८ अ‍ॅम्ब्युलन्स चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. खान यांनी दिली आहे.

जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या एकमेव अ‍ॅम्ब्युन्सने तालुक्यात ७५ तर जिल्ह्यात २७५ रूग्णांची तपासणी करून तातडीचे उपचार यशस्वी केलेले आहेत. त्यामुळे बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची खूपच गरज याभागात असल्याचे स्पष्ट झाले असून ती ग्रामीण भागासाठी वरदान ठरली आहे. मात्र, तालुक्याची लोकसंख्या पाहता किमान ३ बाईक अ‍ॅम्ब्युलन्स येथे असणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून याचा ग्रामीण भागाला खूपच फायदा होणार आहे. तालुक्यात चारीही बाजुला अतिदुर्गम भाग असल्याने किमान तीन बाईक असणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढवावी अश्ी मागणी होत आहे.अशी मिळेल आपल्याला १०८ अ‍ॅम्ब्युलन्स१०८ क्रमांकावर प्रथम फोन केल्यावर हे कॉल अ‍ॅम्ब्युलन्स व बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दोंघांना कॉलसेंटर द्वारे जातात, तेथून अपघाताची किंवा अत्यावश्यक उपचाराकरीता माहिती घेतली जाते, त्यानुसार २५ ते ३० किलोमिटर दरम्यान रूग्णाला किती तातडीने उपचार देणे आहे.च्हे फोन वर दिलेल्या माहितीवरून डॉक्टरांना कळविले जाते, त्यानुसार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन उपलब्ध बी. ए. एम.एस. डॉक्टर थेट रूग्ण असलेल्या ठिकाणावर पोहोचतात व प्रथमोपचार केल्यानंतर मागून येणाऱ्या रूग्णवाहिकेसोबत उपचाराकरीता शासकिय रूग्णालयात दाखल करतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbikeबाईक