शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

फटके खाऊन होतो पोतराजांचा उदरनिर्वाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:56 IST

विक्रमगड : स्वत:चे शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत स्वत:च्याच हाताने त्यावर आसूडाचे फटके मारून पोट भरणारा समाजघटक म्हणजे पोतराज आज जग बदलले असलेतरी त्यांचे आयुष्य मात्र जसे होते तसेच आहे.

राहुल वाडेकरविक्रमगड : स्वत:चे शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत स्वत:च्याच हाताने त्यावर आसूडाचे फटके मारून पोट भरणारा समाजघटक म्हणजे पोतराज आज जग बदलले असलेतरी त्यांचे आयुष्य मात्र जसे होते तसेच आहे. ढोलक्याच घुमणं, परंपरेने चालत आलेला देवीचा देव्हारा आणि चाबूक सारे काही तेच आहे.गावोगावी भटकंती करुन उपाशी तापाशी अवस्थेत आपली भक्ती सादर करुन दिवसभरात मिळालेल्या दक्षिणेतून संध्याकाळी कोठेतरी ठिय्या देवून चूल पेटविली जाते आणि पोट भरण्याची सोय केली जाते. जर पुरेशी दक्षिणा मिळाली नाही तर उपाशी पोटी झोपावेही लागते. त्याचे कुटुंब डोक्यावर देवीचा देव्हांरा घ्ेऊन दारोदारी पोटासाठी भटकंती करीत असते. आज या गावी तर उद्या दुसºया गावी असा त्यांचा नित्यक्रम आठ महिने चालत असतो़ मात्र पावसाळयात हे लोक आपल्या गावी असतात़सध्या विक्रमगडमध्ये असलेल्या व नाशिक जिल्ह्यातील वणी येथून आलेले पोतराजाचे कुटुंब सध्या विक्रमगड-जव्हार परीसरात मुक्कामी आहे. पत्नी, १० वर्षाचा मुलगा व आपल्या अंगावर आसुड ओढणारा पोतराज असे हे कुटुंब आहे.आम्ही भिकारी नाही, आम्ही आईचे सेवेकरी आहोत. आमचाही मान आहे. परंतु आता हे आजच्या पिढीला माहिती नाही त्यामुळे ते आमच्याकडे भिक्षेकरी म्हणून पाहतात. कोणी आम्हांस देवीवाला म्हणतात, कुणी म्हणतात जरीमरीवाला आला, तर कुणी अंगावर आसुड ओढणारा देवीचा भगत आला असे म्हणतात. देवीच्या भक्तांनी आम्हांला अनेक नांवे दिली असली तरी शासन दरबारी आमची कोणत्याही प्रकारची नोंद नाही. त्यामुळे आम्हांला आतापर्यत शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागले आहे़ आम्हांला आमच्याच गावाकडे राहाण्याकरीता गरीबीमुळे धड घरही नाही, उदरनिर्वाहासाठी जमीन जुमला नाही, कर्ज घेऊन धंदा करावयाचा तर त्यासाठी आमचेजवळ आवश्यक ती कागदपत्रे नाहीत, शिक्षण नाही त्यामुळे पोटापाण्यासाठी पावसाळयाचे चार महिने वगळता उर्वरीत आठ महिने असे बिºहाड पाठीवर घेऊन कुटुंबासह डोक्यावर देवीचा देव्हारा घेऊन, गावोगावी भटकंती करावी लागते.आमच्या बरोबर मुला-बाळांनाही शिक्षण सोडून ऊन, थंडीवाºयात खस्ता खात फिरावे लागते़ त्यांना त्यांच्या बालपणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ त्यांना शिक्षणापासून दूर सारणे आमच्या मनालाही पटत नाही पण आमचे जीवनच भटकंतीचे असल्याने त्याला दुसरा पर्याय नसल्याने हे सर्व पोटासाठी करावे लागत असल्याची खंत आण्णा नारायण पवार व त्यांची पत्नी सकुबाई आणि आसुडाचे फटके अंगावर ओढणारा १२ वर्षाचा मुलगा धोंडीबा या पोतराजांनी व्यक्त केली़>वर्षातील आठ महिने सुरु असते अशी परवडपावसाळा संपण्याच्या वेळी साधारणपणे दसºयाच्या आठ दिवस आम्ही आमचे घरदार व गाव सोडून जगण्यासाठी म्हणुन बरोबर निवडक सामान घेऊन निघतोे़ पहाटे सूर्योदयापूर्वी मुलाबाळांच्या जेवणची सोय करुन सकाळी घरातील कर्ती महिला डोक्यावर जरीमरी देवीचा देव्हांरा ठेऊन व खांद्याला घुमणे अडकऊन जवळच्या गावात निघतो़ गावाच्या सीमेवर येताच दोन्ही हातातील काठीच्या सहाय्याने ढोलकीतून घुमण्याचा आवाज काढतो़ हातातील आसूडाचे अंगावर फटके ओढतो.त्या आवाजाने महिला, मुली पोरेबाळे पोतराज पाहण्यास धान्याने भरलेली वाटी व एकदोन रुपये घेऊन आमची वाट पाहत उभे असतात यातूनच या भागातील महिला या धार्मिक असल्याचे समजल्यावर आम्ही त्या ठिकाणी देवीचा कार्यक्रम करतो़ त्यावेळी महिला नारळ ओटी भरतात तर काही नवस बोलतात़ जे मिळेल ते खुशीने घेतो़ कोणाकडेही जादा पैशांची मागणी करीत नाही़ तसा आमचा पोतराजांचा नियमच आहे़ एकदोन कार्यक्रम करुन दिवसाला शंभर-दोनशे मिळतात़