शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

तरुणीची फसवणूक करणारा ताब्यात,  गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:52 AM

नालासोपारा येथील आपल्या मैत्रिणीला फिरण्याच्या बहाण्याने रिसॉर्टमध्ये नेऊन शितपेया मधून गुंगीचे औषध टाकून तिच्याशी जबाबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उबेत शेख रा.मालाड या आरोपी विरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर : नालासोपारा येथील आपल्या मैत्रिणीला फिरण्याच्या बहाण्याने रिसॉर्टमध्ये नेऊन शितपेया मधून गुंगीचे औषध टाकून तिच्याशी जबाबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उबेत शेख रा.मालाड या आरोपी विरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ती मुलगी व तिचा मित्र आरोपी शेख यांची ओळख मालवणी येथील एका महाविद्यालयात झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांच्या चोरून चोरून भेटीगाठी होऊ लागल्या. या प्रियकराने आपण आपल्या एका मित्रांसह फिरायला जाऊ असे या प्रेयसीला सांगून मित्र व त्याची प्रेयसी आणि हे दोघे असे चार जण २३ मार्च रोजी अर्नाळा येथील एका रिसॉर्ट मध्ये फिरण्यासाठी गेले. तेथे उबेत याने एक रूम बुक करून आरोपीने आपल्या प्रेयसी कडे शारीरिक संबंधा ची मागणी केली. यावर प्रेयसीने नकार दिल्याने आरोपीने शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्या असहाय्यतेचा फायदा उचलीत संमती नसतांना जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला. या उपर झाल्या प्रकारची अश्लील चित्रफीत बनवित कुणाकडे वाच्यता न करण्याचा दम दिला. या घडलेल्या प्रकारानंतर आरोपीत याने आपल्या प्रेयसीकडून २ लाख रु पयाची मागणी केली व पैसे न दिल्यास ही चित्रिफत सोशल मीडियावर दाखिवण्याची धमकी दिली. आपल्या मुळे घरच्यांची अब्रू जाऊ नये म्हणून तिने आपल्या वडीलांचेच एटीएम चोरले. आणि ते आरोपीच्या ताब्यात दिले. त्याने एटीएमद्वारे २ लाख १० हजाराची रक्कम काढल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळताच त्यानी चौकशी सुरु केली तेव्हा आपले एटीएम कार्ड गायब झाल्याचे व घरातील कुणीतरी हे कृत्य केल्याचा संशय त्यांना आला. चौकशी अंती आपल्यावर गुदरलेला प्रसंग त्या मुलीने आपल्या वडिलांच्या कानी घातला. पुढे तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाच्या घटनेचा वृत्तांत तिने आपल्या वडिलांना सांगताच त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन सरळ अर्नाळा पोलीस स्टेशन गाठले. १२ एप्रिल रोजी आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला असून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक सी. एन. कोळेकर व सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार