वसईत ११४ संशयित डेंग्यू रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:15 PM2019-11-05T23:15:11+5:302019-11-05T23:15:23+5:30

१० महिन्यांची आकडेवारी : तर मलेरिया रुग्णांची संख्या ५० वर

Population: 114 suspected dengue patients | वसईत ११४ संशयित डेंग्यू रुग्ण

वसईत ११४ संशयित डेंग्यू रुग्ण

Next

मंगेश कराळे 

नालासोपारा : वसई तालुक्यात कचऱ्यामुळे मलेरिया आणि डेंगूचा प्रसार होत असून मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आरोग्य विभाग कीटकनाशके आणि औषधांवर कोट्यवधी रूपये खर्च करत असून हा खर्च कागदावर दाखवण्यापुरताच मर्यादित आहे का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई - विरार मनपाच्या काही प्रभागात घाणीचे साम्राज्य, कचºयाचे ढीग आणि दुर्गंधी यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचे रु ग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मनपा तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची रांग लागलेली आहे. जानेवारी २०१९ ते ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत ११४ संशयित डेंग्यू तर मलेरियाचे ५० रु ग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय आरोग अधिकारी डॉ. तबस्सुम काझी यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. शहरातील कचरा आणि डासांची संख्या काही कमी झालेली नाही. दरम्यान, विरारच्या सहकार नगरमधील एकाच परिवाराच्या चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचेही कळते.
मनपा हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण याची संख्या हजारोंच्या घरात असल्याची माहिती एका डॉक्टर अधिकाºयाने नाव न सांगण्याचा अटीवर दिली. खाजगी क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाने आदेश काढून डेंग्यू, मलेरिया रुग्णाची माहिती देण्यासाठी आदेश काढले पाहिजे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

डेंग्यूच्या कचाट्यात पोलीस : वालीव पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना डेंग्यूची लागण झाली होती. गोपनीय विभागातील पोलीस हवालदार रवी पवार, बाफाने चौकी येथील पोलीस नाईक घुगे आणि पोलीस कर्मचारी सोनवणे यांच्या मुलीला डेंग्यूची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना उपचारासाठी ग्लोबल, प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तुळींज पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आणि अधिकाºयालाही डेंग्यूची लागण झाल्याचे समजते.

कीटकनाशके आणि औषधांची फवारणी महानगरपालिकेकडून करण्यात येत नसल्यामुळे ही रोगराई आणि डासांची संख्या वाढली आहे.
- मनीषा वाडकर, संतप्त नागरिक

मनपा रुग्णालयातील ओपीडीमध्ये आलेल्या पेशंटच्या नोंदीवरून आरोग्य विभाग माहिती देते. कोणीही काही सांगितले तरी तो आकडा ग्राह्य धरला जात नाही. - बळीराम पवार, आयुक्त, वसई मनपा

Web Title: Population: 114 suspected dengue patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.