शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

हप्ते वसुलीची चित्रफित काढणाऱ्या युवकास पोलिसाची पट्ट्याने मारहाण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:18 IST

अवैध रित्या होणारी वाहतूक रोखण्याची जबाबदारी असणाºया पोलिसांकडून चिरीमिरीच्या मोहाने केला जाणारा कानाडोळा येथील एका जागृक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतांना हप्तेबाज पोलीसांनी त्याला चौकीत नेवून पट्ट्याने मारहाण करुन केलेले रेकॉर्डिंग डिलिट करायला लावण्याचा प्रकार झाला आहे.

- हुसेन मेमनजव्हार  - अवैध रित्या होणारी वाहतूक रोखण्याची जबाबदारी असणाºया पोलिसांकडून चिरीमिरीच्या मोहाने केला जाणारा कानाडोळा येथील एका जागृक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतांना हप्तेबाज पोलीसांनी त्याला चौकीत नेवून पट्ट्याने मारहाण करुन केलेले रेकॉर्डिंग डिलिट करायला लावण्याचा प्रकार झाला आहे. या मोगलाई विरोधात आदिवासी समाज एकवटला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.३० मार्च रोजी सकाळी साडे आकराच्या सुमारास पाथर्डीनाक्यावरील कुलदिप हॉटेळ समोर पोलीस शिपाई मुंडे याने जीप मालकाकडून वर्दीचा बडगा दाखवून हप्ता वसूली केली. नेमका हा प्रकार तेथे उभा असणारा नितीन सोमनाथ किरकिरा याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान, आपले बिंग फुटणार असल्याने मुंडे याने त्याला धमकावत केलेली व्हिडिओ शुटींग डिलिट करायला भाग पाडेले.हा प्रकार येवढ्यावरच थांबला नसुन दंडेली करणाºया पोलीसाने त्यास तब्बल चार तास चौकीमध्ये डांबून पट्ट्याने मारहाण केली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ रामखिंड गावातील आदिवासी संघर्ष समितीने मुंडे यास अटक करण्यासाठी जव्हार पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्यासंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच मंगळवारी एस.पी. मंजुनाथ सिंगे यांना निवेदनाची प्रत दिल्याचे किरकीरा यांनी सांगितले.हेच का सद्रक्षणाय...मुंडे सोबत एक पोलीस कर्मचारी पण होता, या दोघांची कसून चौकशी करून त्यास त्वरीत निलंबित करण्यात यावे, त्यांना शासन झाले नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू, पोलीस हप्ते वसुली करतांना व्हिडीओ काढून चोरी पकडून देतो म्हणून, एका युवकास पोलीस ठाण्यात आणून एखाद्या आरोपी सारखे पट्ट्याने मारतात ही बाब पोलीस स्टेशनला लाजीरवाणी आहे, त्यामुळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.याबाबत गावकर्यांनी मिळून घडलेला सर्व प्रकार जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भोये यांना सांगितला. मात्र, त्यांनी दखल घेतलेली नसून हप्तेखोर पोलीसाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही जिल्हा पोलीस अधिक्षक यांनाही तक्र ार केली आहे.- सोमनाथ किरकीरा, वडिलपालकमंत्री आल्याने बंदोबस्त होता. मुंडे यांनी जीप वाल्यांना गाड्या इतरत्र पार्क करण्याच्या सुचना केल्या. त्याचा राग मनामध्ये धरुन सगळा बनाव रचण्यात आला आहे. नितीन किरकीरा या युवकास मारहाण केलेली नसून चौकीमध्ये त्यास समज देवून सोडण्यात आले होते.- डी. पी. भोये, पोलीस निरीक्षक

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार