शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांनी टाळले ३ खून, कुटुंबाचे घडविले मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:47 IST

पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी त्याला बोलण्यात तासभर गुंगवून अधिकाº्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्या कुटुंबाचे समुपदेशन करून संपूर्ण कुटुंबाला वाचविण्यात यश मिळविले.

हितेंन नाईकपालघर : मी खूप संकटात आहे, माझे संतुलन ढासळत असल्याने मी माङया पत्नीसह माङया दोन्ही मुलींचा गळा कापणार असल्याचा एका साठ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीचा मेसेज आल्या नंतर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी त्याला बोलण्यात तासभर गुंगवून अधिकाº्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्या कुटुंबाचे समुपदेशन करून संपूर्ण कुटुंबाला वाचविण्यात यश मिळविले.नालासोपारा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील एका गृह संकुलात राहणाºया व एअर इंडियामधून सेवानिवृत्त झालेल्या साठ वर्षीय व्यक्तीचा मी जीवनाला कंटाळलो असून मी आता माझ्या पत्नीसह दोन्ही मुलींचा गळा कापून खून करणार असल्याचा मेसेज पोलीस अधीक्षक कार्यालयाने फेसबुक वर बनविलेल्या पालघर पोलीस पेजवर येतो.आणि या पेजवर सक्रीय असलेले पोलीस उपनिरीक्षक हेमंत काटकर हे त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब याची कल्पना ते पोलीस अधीक्षकांना देतात. त्यातील गांभीर्य समजून त्यांनी काटकर ह्यांना सदर व्यक्तीस बोलण्यात गुंगवून ठेवण्याची सूचना दिली. त्यानुसार अधिकाधिक वेळ त्या व्यक्तीस बोलण्यात, मेसेज मध्ये गुंगवून ठेवल्या नंतर नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव ह्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.मी सेवानिवृत्त झाल्या नंतर मला माझी पत्नी मला महत्व देत नाही, मुलीही चांगली वागणूक देत नसल्याचे त्या व्यक्तींनी पोलिसांना सांगितले. तर हे सेवानिवृत्त झाल्यापासून घरात एकही पैसा देत नसून दोन्ही वेळेला दारू पीत असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांकडे केली. त्यामुळे घरात उभी राहिलेली कटुतेची भिंत पाडून सर्व कुटुंबाला पुन्हा एकत्र बांधण्याचे कौशल्य पो.नि. जाधव ह्यांना दाखवायचे होते. त्यांनी दोन दिवस पती-पत्नी, त्यांच्या दोन्ही मुली ह्यांच्याशी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये समुपदेशानाद्वारे बातचीत सुरू ठेवून त्यांना जीवनाचे महत्व पटवून दिले. त्यांनाही आपल्या चुका समजल्या. सर्वांनी आता आपल्यातील संघर्ष संपवून चांगले आयुष्य जगू, असा शब्द त्यांनी आपल्याला दिल्याची माहिती पो. नि जाधव ह्यांनी लोकमतला दिली. पोलीस अधीक्षक सिंगे व त्यांच्या अधिकाºयाने कार्यतत्परता दाखविल्याने या कुटुंबात घडणारी मोठी शोकांतिका टळली व हे कुटुंब आनंदाने एकत्र राहणार असल्याने वेगळेच समाधान मिळाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.>आम्हाला त्या जेष्ठ व्यक्तींचा फोन आल्यानंतर 14 व्या मिनिटात आमची टीम त्यांच्या कडे पोचली.आम्हाला ट्विटर,फेसबुक ह्या सोशल मीडिया द्वारे लोकांनी तक्र ार अथवा आपल्या समस्या मांडल्यास आम्ही त्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करू.- मंजुनाथ सिंगे,पोलीस अधीक्षक, पालघर

टॅग्स :Policeपोलिस