शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पालघर शहरातील बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2023 19:41 IST

दोन्ही कुटुंबे यवतमाळ येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर :पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे  लोन पालघर शहरात पोहचले असताना लग्न मंडपात दोन अल्पवयीन मुलांची लग्नगाठ बांधली जात असताना पालघर पोलिसांनी हे लग्न रोखून धरीत वधूला विरारच्या गुड शेफर्ड संस्थेकडे सुपूर्द केले आले. दरम्यान, दोन्ही कुटुंबे यवतमाळ येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल असून जिल्ह्याच्या पूर्व भागाकडील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी आदी आदिवासीबहुल दुर्गम भागात अल्पवयीन मुला- मुलींची लग्न लावून देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आजही सुरू आहे. त्यातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हे बालविवाह रोखण्यासाठी अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न फोल ठरत असताना पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियान या सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अभियानाला मोठे यश येत आहे. अनेक लोक या अभियानाला जोडले गेले आहेत. त्यातून अतिदुर्गम भागात आजही अनेक कुटुंबे स्वतः पुढे येत बालविवाहाला विरोध दर्शवत आहेत.

पालघर शहरातील न्यायालयाच्या शेजारी असलेल्या शांतीनगर येथे दोन अल्पवयीन मुलांचा विवाह लावला जात असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनकडून पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अप्पासाहेब लेंगरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सपोनि मंजुळा शिरसाठ आणि उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांना घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी दोन पोलिसांना साध्या वेशात पाठवून खातरजमा केल्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान हे लग्न लावण्याच्या दरम्यान लग्न गाठी बांधल्या जात असतानाच अचानक पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे लग्न थांबवले.

दोन्ही कुटुंबे यवतमाळमधील

 यवतमाळ येथील कुटुंबे असलेल्या या दोन्ही मुलांचे कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर नवरदेव मुलाचे वय १९ तर नवरी मुलीचे वय १८ असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर गावाकडे अशीच लग्ने लावली जात असतात, असे सांगत दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडण्याची वऱ्हाडी मंडळींची विनंती पोलिसांनी नाकारली आणि नवरी मुलीला महिला बालकल्याण समिती पालघर यांच्याकडे पाठविण्यात आले. त्या समितीच्या आदेशाने या मुलीला विरार येथील गुड शेफर्ड संस्था येथे पाठविण्यात आले. पुढील कारवाई पालघर पोलिस ठाण्याच्या सपोनी शिरसाठ या करीत आहेत.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारी