शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, लोण आता शहरापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 08:45 IST

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे लोण पालघर शहरात पोहोचले आहे.

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे लोण पालघर शहरात पोहोचले आहे. लग्न मंडपात दोन अल्पवयीन मुलांची लग्नगाठ बांधली जात असताना पालघर पोलिसांनी हे लग्न रोखत वधूला विरारच्या गुड शेफर्ड संस्थेकडे सुपूर्द केले आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल असून, जिल्ह्याच्या पूर्व भागाकडील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी आदी आदिवासीबहुल दुर्गम भागात अल्पवयीन मुला-मुलींची लग्न लावून देण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हे बालविवाह रोखण्यासाठी अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न फोल ठरत असताना पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून ‘जनसंवाद अभियान’ या सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अभियानाला मोठे यश येत आहे. अनेक लोक या अभियानाला जोडले गेले आहेत. त्यातून अतिदुर्गम भागात आजही अनेक कुटुंबे स्वतः पुढे येत बालविवाहाला विरोध दर्शवत आहेत.

पालघर शहरातील न्यायालयाच्या शेजारी असलेल्या शांती नगर येथे अल्पवयीनांचा विवाह लावला जात असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनकडून पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अप्पासाहेब लेंगरे यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक मंजुळा शिरसाठ आणि उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांना घटनास्थळी पाठवले. तेथे पोलिसांना साध्या वेशात पाठवून संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान लग्नगाठ बांधली जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करीत लग्न थांबविले. 

नवरी मुलीचे कुटुंब यवतमाळचेनवरी मुलीचे कुटुंब यवतमाळचे आहे, तर  नवरदेवाचे कुटुंब पालघरचे आहे. दोन्ही कुटुंबांच्या मुलांचे कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर नवरदेवाचे वय १९, तर नवरी मुलीचे वय १७ असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गावाकडे अशीच लग्ने लावली जात असतात, असे सांगत दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडण्याची वऱ्हाडी मंडळी विनंती करत होते. मात्र, पोलिसांनी नवरी मुलीला महिला बालकल्याण समितीकडे पाठविले. समितीच्या आदेशाने या मुलीला विरार येथील गुड शेफर्ड संस्थेत पाठविण्यात आले. पुढील कारवाई पालघर पोलिस करत आहेत.

टॅग्स :palgharपालघर