शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:37 IST

पर्यटकांना चिंचोटी, देवकुंडी यांसारखे धबधबे आणि ओढ्यांच्या ठिकाणी मनाई करण्यासाठी येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे.

नालासोपारा : पाऊस सुरू झाल्यापासून वसईतील पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. अनेकदा अतिउत्साहामुळे त्यांच्याकडून जीवाला धोका होईल, अशी कृत्ये केली जातात. हे लक्षात घेऊन अतिवृष्टीत या पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडू नये, यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने मनाई आदेश काढले आहेत.

नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामन, चिंचोटी परिसरात अनेक हौशी पर्यटक फिरायला येतात. मात्र, या भागातील पर्यटन पूर्णपणे असुरक्षित असून, येथे दरवर्षी पाण्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यादृष्टीने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने मनाई आदेश लागू करत येथे जाणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच दिला आहे. याबाबत जनतेला वेळोवेळी आवाहन करण्याबरोबरच दररोज पोलिसांचा बंदोबस्तही राहणार आहेत. तसेच मनाई आदेशाचे फलक या परिसरात लावण्यात आलेले आहेत.  या मनाईमुळे पर्यटकांना येथून परत जावे लागते आहे. त्यामु‌ळे पालघर, डहाणू येथील पर्यटनस्थळांकडे कल वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पर्यटकांना चिंचोटी, देवकुंडी यांसारखे धबधबे आणि ओढ्यांच्या ठिकाणी मनाई करण्यासाठी येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. त्याबाबत रीतसर पर्यटकांना आवाहन केले जात आहे. विजय कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नायगाव पोलिस ठाणे.

पर्यटनस्थळांवर जीवघेणा सेल्फी खेळधोकादायक पद्धतीने सेल्फी घेण्यासाठी स्टंट करताना अनेकांचा पर्यटनस्थळांवर मृत्यू झालेला आहे. धोकादायक ठिकाणी पर्यटन करण्यास मनाईचे सूचना फलक लावलेले असतानाही अनेक पर्यटक आपल्या जिवावर बेतेल, असे स्टंट करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे.

पर्यटकांचा हिरमोडवसई तालुक्यातील तुंगारेश्वर, चिंचोटी हे धबधबे पर्यटकप्रिय आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यातील डोंगराळ भागातील या धबधब्यावर जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारtourismपर्यटनmonsoonमोसमी पाऊस