शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

भाईंदर पालिका भूखंड बीओटी तत्त्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:59 IST

निविदा काढल्या, समाजबांधवांमध्ये नाराजी

मीरा रोड : आगरी समाजासाठी आगरी समाज उन्नती संस्थेला भाईंदरच्या आझादनगरजवळील सांस्कृतिक भवनाचा आरक्षित सहा हजार चौ.मी.चा भूखंड देण्याचा महासभेने ठराव केला आहे. मात्र, आता महापालिकेनेच हा भूखंड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर देण्यासाठी खुल्या निविदा मागवल्या आहेत.आरक्षण क्र. १२२ हे सामाजिक वनीकरण आणि खेळाच्या मैदानासाठी असताना महापालिका, लोकप्रतिनिधी यांनी मात्र ते विकसित करण्यास कमालीची टाळटाळ चालवली आहे. टीडीआर देऊनही आरक्षणाच्या काही जागेत अतिक्रमण झाले आहे. मूळ आरक्षण विकसित केले जात नसतानाच सरकार, महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी मात्र आधी या आरक्षणात बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालन मंजूर केले. त्यापाठोपाठ याच जागेत आणखी एक सांस्कृतिक भवनचे १२२ अ हे सहा हजार चौ.मी.चे नवे आरक्षण अस्तित्वात आणले. परंतु, आगरी भवन म्हणून मंजुरीस सरकारने नकार दिला. त्यानंतर, महासभेने आगरी समाज उन्नती मंडळास आगरी समाजासाठी आरक्षणाची जागा नाममात्र वार्षिक १२ हजार रुपये भाड्याने देण्याचा ठराव केला.महासभेचा ठराव आयुक्त बालाजी खतगावकर यांनी नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला. संस्थेला भाड्यात सवलत मिळावी म्हणून महापालिका नियमांचा संदर्भ दिला. भूखंड नाममात्र भाड्यात द्यायचा असेल, तर वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्यासाठीच देता येतो. त्यामुळे अडचणीत आलेल्या आयुक्तांनी नगरविकास विभागास सुधारित पत्र पाठवून भाड्याचा उल्लेखच काढून टाकला. लोकलेखा समितीच्या अहवालानुसार बाजारभावाने जागा भाड्याने देण्याच्या परिपत्रकाचे महासभा व आयुक्तांनी उल्लंघन केले. या भूखंडाची किंमत रेडीरेकनरनुसार १९ कोटी पाच लाख इतकी होत असल्याने सरकारी नियमानुसार जागा मूल्याच्या साडेपाच टक्के वार्षिक भाडे एक कोटी चार लाख इतके होत आहे. सरकारने अजूनही आयुक्तांनी पाठवलेल्या महासभेच्या प्रस्तावावर मंजुरी दिली नसताना दुसरीकडे महापालिकेनेच निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. सांस्कृतिक भवनचे आरक्षण विकसित करण्यासाठी संस्था, कंपनी आदींकडून जाहीर निविदा मागवल्या आहेत.आगरी समाजाची राजकीय फायद्यासाठी फसवणूक व फरफट चालवली आहे. आम्ही सतत संस्थेला समाजाची नाचक्की आणि नुकसान करू नका म्हणून विनवणी करत आहोत. आगरी समाज भवन हे समाजाचा स्वाभिमान असताना सांस्कृतिक भवनसाठी राजकीय नेत्याच्या दावणीला समाज बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.- अ‍ॅड. सुशांत पाटील, सामाजिक कार्यकर्तेमहासभेने आगरी समाज उन्नती संस्थेचा केलेला ठराव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यावर, अजून कोणते निर्देश आलेले नाहीत. परंतु, नगरविकास विभागाशी चर्चा केल्यानंतर सांस्कृतिक भवनसाठी निविदा मागवल्या आहेत. - बालाजी खतगावकर, आयुक्त

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक