शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

खांडचा बंदरा एक पिकनिक पॉर्इंट

By admin | Updated: July 9, 2017 01:09 IST

पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौदर्य लाभलेला विक्रमगडमधील पिकनिक पॉईंट म्हणजेच पलुचा धबधब्ब्यानंतर विक्रमगडकरांची ओळख

- राहूल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौदर्य लाभलेला विक्रमगडमधील पिकनिक पॉईंट म्हणजेच पलुचा धबधब्ब्यानंतर विक्रमगडकरांची ओळख असलेला व बारमाही पाणी असलेला खांडचा बंदरा असून निसर्गाने भरभरुन वरदान दिलेल्या या भागात पावसाळयात मनसोक्त आनंद लुटणाऱ्यांचीही गर्दी असते. निखळ निसर्ग सौर्द्य आणि बिन धोक्याची पाण्यातील मौज मस्ती हे येथील वैशिष्ट्य आहे.शनिवार व रविवारी पलुचा धबधबा व खांडचा बंधारा येथे पर्यटकही येत असतात ़व पाण्यामध्ये डुुंबण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतात़ पुढील आठवडयात गटारीचे वेध लागत असल्याने बाहेरील पर्यटकांनी शुुक्रवार पासूनच येथे बुकींग करण्यास सुरूवात केली आहे़ जोडूनच दोन दिवस सुट्टी असल्याने येथे पिकनिक करण्यासाठी बाहेरील पर्यटक दाखल झाले आहेत़पावसाळा सुरु झाला की, या नैसर्गिक सौदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुुभ्र धबधबे. विक्रमगडपासून डोंगर भागात उंचावर जंगल पसरलेले आहे़ हाच जंगलपट्टा निसर्गमित्रांना भुरळ घालतो. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्यानें पक्षी निरिक्षकही या भागात येत असतात़ खांडचा बंधाऱ्यात जून ते आॅक्टोंबर या काळात पर्यटकांची गर्दी असते. अन्य धबधबे धोकादायक ठरू लागल्याने सुरक्षित असणाऱ्या पिकनिक स्पॉटच्या शोधात असणाऱ्या तरुणाईची या स्पॉटला पसंती मिळते आहे.बारा महिने पाण्याची हमी : विक्रमगड ग्रामपंचायत अंतर्गत याच बंधाऱ्यातून विक्रमगड शहर, यशवंतनगर, वाकडुचापाडा, टोपलेपाडा, संगमनगर आदी भागांना नळाद्वारे पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जातो़ या बंधाऱ्यास बाराही महिने पाणी असल्याने कधीही विक्रमगडकरांना पाण्याची टंचाई भासत नाही़ त्यामुळे सलग तीन वर्षे जरी पाऊस पडला नाही तरी येथे पाणी टंचाई उदभवणार नाही.त्यातच येथे छोटाचा चौकोनी आकाराचा हौदासारखा मोठा भाग असुन तो जास्त खोलगट नाही. त्यामुळे डुंबणाऱ्यांंना सुरक्षेची हमी मिळते.