शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा फटका; राजेंद्र गावित यांनी केली भातशेती नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:16 IST

नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश

कासा : डहाणू तालुक्यातील गावामध्ये परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खासदार राजेंद्र गावित यांनी रविवारी त्याची पाहणी केली. यावेळी शेतात पाणी भरले असल्याने खा. गावितांनी चक्क चिखलात उतरून शेतीची पाहणी केली.खा. गावित यांनी कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील कासा भागातील वाघाडी, धरमपूर, बांधघर, ओसरवीरा, धानिवरी आदी गावातील नुकसानग्रस्त भातिपकाची पाहणी केली. भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भात शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी तसेच महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, शेतकºयांना शासनाकडून हेक्टरी १३ हजार ५०० एवढी भरपाई दिली जात असून ही खूप कमी आहे. तसेच बºयाच शेतकºयांच्या शेतजमिनी या एक हेक्टरपेक्षा कमी आहेत. त्यांच्या भात शेतीचे पूर्ण नुकसान झाले असतांना केवळ त्यांना २ ते ३ हजार नुकसान मिळते.

परतीच्या पावसाने भाताची कडपे भिजून गेली आहेत. वादळाने पीक खाली कोलमडून पडली आहेत. तसेच पिकांच्या दाण्याना नवीन कोंब फुटले आहेत. दरम्यान, मधल्या काळात पाच - सहा दिवस उघाडी मिळाल्याने तयार झालेल्या भात कापणीस सुरु वात केली. मात्र पुन: सतत पाच दिवस पाऊस सुरूच राहिल्याने बर्याच शेतकºयांची कापलेली पिके आठवडाभर शेतातच राहिल्याने कुजून गेली आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने भात कापणीची कामे करता येत नाही. ढगाळ वातावरणामुळे शेतातील भाताच्या दाण्यावर बुरशी चढली आहे. त्यामुळे दाणे काळे पडले आहेत. त्यामधून येणारा तांदळाचे तीन चार तुकडे होतात. तसेच भाताच्या मळणी नंतरच्या पावलीचा दर्जा खालावला आहे. पावली काळी पडल्याने ती गुरांसाठी विक्री आणि साठा करण्याच्या लायक राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकºयांनी शासनाकडून हेक्टरी ४० हजार रु पये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खा. गावित यांच्याकडे केली. यावेळी खासदार गावित यांनी नुकसानीची परिस्थिती लक्षात घेता जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकºयांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी कासा मंडळ अधिकारी संदीप संखे, शेतकरी उपस्थित होते.१५ हजार ६७ हेक्टर लागवड क्षेत्रडहाणू तालुक्यात एकूण १५ हजार ६७ हेक्टर लागवड क्षेत्र आहे यामध्ये १४ हजार ८३४ हेक्टर भात लागवड क्षेत्र असून १९५ हेक्टर खुरासनी, ३८ हेक्टर नागली, १९५ हेक्टर उडीद लागवड क्षेत्र आहे.

टॅग्स :Rainपाऊस