शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

पाऊस अन् मजूरच ठरवणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:05 IST

जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून एकूण आठ तालुक्यात आतापर्यंत ६२ टक्के लागवड झाली असून अन्य सात ते आठ पिकांची लागवड झाली आहे. भात पिकाची पेरणीनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून एकूण आठ तालुक्यात आतापर्यंत ६२ टक्के लागवड झाली असून अन्य सात ते आठ पिकांची लागवड झाली आहे. भात पिकाची पेरणीनंतर पुनलागवड केली जाते. त्यामुळे आगामी काळात पावसाचा वरदहस्त कायम राहिल्यास आणि मजुरांची उपलब्धता हे समीकरण जुळून आल्यास ही टक्केवारी वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील एकुण क्षेत्रापैकी आतापर्यंत ४७७८१.०० प्रत्यक्ष लागवड झाली आहे. ही टक्केवारी ६२ इतकी आहे. या मध्ये मोखाडा तालुक्यात सर्वाधिक ८४.५२ टक्के लागवड झाली आहे. पालघर तालुक्यात १५५१४.०० हे (हेक्टर) पैकी ७७७३.०० लागवड करण्यात आली आहे. तर वसई १०६१३.०० हे. पैकी ५३३० हे., डहाणू १४११७.०० हे. पैकी १०१५२.०० हे., तलासरी ७४५७.०० हे. पैकी ५१४७.०० हे., वाडा १३४३८.०० हे. पैकी ८६८४.०० हे., विक्रमगड ७२५५.०० हे. पैकी ४६८४.०० हे., जव्हार ६०७६.०० हे. पैकी ४०९०.०० हे. आणि मोखाडा तालुक्यात १९१८.०० हे. पैकी १६२१.०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक भाताचे क्षेत्र हे वाडा तालुक्यात असून येथील वाडा कोलम हे वाण सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे वाण हायब्रिड स्वरुपात उपलब्ध झाल्याने अन्य तालुक्यात त्याच्या लागवडीस पसंती दिली जात आहे. भाताच्या एकूण लागवडी पैकी १० टक्के ही पेरणीची लागवड असते. २२ दिवसांची रोपे ही लागवडी योग्य असतात. तथापी जून महिन्यात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्हात आतापर्यंत भाताच्या लावणीसाठी समाधानकारक पाऊस झाला आहे. आगामी काळात पावसाची साथ तसेच मजुराची उपलब्धता हे समीकरण जुळून आल्यास लागवडीचे अपेक्षित धेय्य साधले जाईल असे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, भात पिका प्रमाणेच नागली, वरई, बांधावरील तूर, उडीद, भुईमूग, मूग, तीळ, खुरासणी आणि अन्य कडधान्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात नागली लागवडीचे क्षेत्र ११२०५.०० हे. असून ७०५२.५० हे. लागवड झाली आहे. तर वरई पिकाचे लागवडी क्षेत्र ९१२२.०० हे. असून ४९९९.२० हे. क्षेत्रात लागवड झाली आहे. बांधावरील तूर क्षेत्र २५४६.०० तर २१०३.५३ हे. लागवड, उडीद ३३८६.०० सरासरी क्षेत्रापैकी २५७१.८६ हे. झाली आहे. मूग ४३२.०० हे पैकी ६१.०० हे., भुईमूग ३०८.०० पैकी ९४.१० हे. , तीळ ६००.०० हे. पैकी ११०.३० हे. इतर कडधान्य १२१३.०० हे पैकी १३०.६० हे. लागवड, भुईमूग ३०८.०० पैकी ९४.१० हे., तीळ ६००.००११०.३० हे. क्षेत्रात आणि खुरासणी १७६६.०० हे. पैकी १४८२.५५ हे. करण्यात आली आहे. या सर्व पिकांचे जिल्ह्यातील एकूण क्षेत्र १०६९६६.०० हे. इतके असून आजतागायत ६६३८६.६४ हे. वर लागवड झाली असून हे प्रमाण ६२.०६ टक्के इतके आहे. दरम्यान, भात लागवडीनंतर खुरासणी हे पीक आठ पैकी वसई, पालघर, तलासरी वगळता अन्य तालुक्यात घेतले जाते. जव्हार तालुक्यात नागली, वरई, तूर, भुईमूग आणि उडीद या पिकाचे लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. तर विक्रमगडमध्ये मूग लागवड केली जात असून सरासरी ६३.०० पैकी ६१.०० हेक्टर लागवड पूर्ण झाली आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यात भुईमूगाची लागवड अनुक्र मे ६० व २५ टक्के इतकी लागवड झाल्याची माहिती पालघर जिल्हा कृषी विभागाकडून प्राप्त आली आहे.