शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा लोकांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 02:53 IST

जिल्ह्यात १५० घरांची पडझड, ११ जनावरे वाहून गेली : किनारपट्टीवर बसत होत्या वादळी वाऱ्याच्या धडका

पालघर : गुरुवारी मुसळधार पावसासह वादळी वारे वाहणार असल्याच्या कुलाबा वेधशाळेच्या इशाºयाला चकवा देत जिल्ह्यातील किनारपट्टी भागासह शहरी भागात पावसाने संध्याकाळपर्यंत विश्रांती घेतल्याने आपले उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा प्रयत्न अनेक कुटुंबे करीत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १५० घरांची पडझड झाली असून कुठेही जीवितहानीची घटना घडलेली नाही.

जिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सकाळपासून उसंत घेतल्याचे चित्र दिसत होते. मात्र, रात्री पडलेल्या पावसाने अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. मंगळवारपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जीवन अस्ताव्यस्त केले असून सर्व गाव, पाडे शहरातील घरे, दुकाने यात पाणी शिरून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. जिल्ह्यातील पालघर, सफाळे, केळवे रोड, बोईसर, वाणगाव, डहाणू आदी रेल्वे स्थानकांतील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत अत्यावश्यक प्रवाशांसाठी सुरू असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली होती, मात्र आज ती काही प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले.

पालघर शहरातील विष्णूनगर, लोकमान्य पाडा, भरवड पाडा, घोलवीरा आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांच्या घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट आदी सामान भिजले होते. जिल्ह्यात बोईसर, पालघर, केळवे, डहाणू आदी अनेक भागात घरात पाणी शिरल्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक कुटुंबीय आपल्या घराची झालेली पडझड सावरण्यात आणि स्वच्छता करण्यात मग्न असल्याचे पाहावयास मिळाले.पालघर नगरपालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर भरवाडपाडा तर पालघर ग्रामीण भागातील गणेश नगर, भीम नगर,आगवण, कुडण, मिठागर, एबूर, उमरोळी, दातिवरे, चिंचपाडा तर वसई तालुक्यातील कोल्ही आणि डहाणू तालुक्यातील वाणीपाडा येथील १७० कुटुंबेबाधित झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले असून जिल्ह्यात अंशत: पडझड झालेल्या कच्चा घरांची संख्या ११९ आहे, तर अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या १७ तर पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या १३ आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात कुठलीही जीवितहानी झाली नसून डहाणू तालुक्यातील शेणसरी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेली ममता लिलका ही पाच वर्षीय मुलगी सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे. तर या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे डहाणू तालुक्यातील दोन गाई, एक रेडा, आठ बकºया पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.वेधशाळेने दिलेल्या इशाºयाला चकवा देत पावसाची विश्रांतीजिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सकाळपासून उसंत घेतल्याचे चित्र दिसत होते. मात्र, रात्री पडलेल्या पावसाने अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली गेल्याने पालघर-बोईसर, पालघर-मनोर या रस्त्यांवरील वाहतूक थोड्या वेळेसाठी विस्कळीत झाली होती.

टॅग्स :palgharपालघरRainपाऊस