शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पेल्हार पोलिसांची कामगिरी, १५ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 19:25 IST

घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला केली अटक.

मंगेश कराळेनालासोपारा : पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून १५ गुन्ह्यांची उकल करून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दुचाकी, सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

१९ सप्टेंबरला पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल साई दर्शन बार व लॉजिंग तसेच नवकार ट्रेडर्स याठिकाणी चोरट्याने ६६ हजारांची चोरी केली होती. पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून सराईत आरोपी इमरान अन्सारी उर्फ छोटे उर्फ इमो आणि शफीउल्ला अतिउल्ला उर्फ सोनू यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांचा गुन्ह्यात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाल्यावर ४ सप्टेंबरला अटक करण्यात आल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

तपासादरम्यान पेल्हार पोलीस ठाण्यातील १० गुन्हे, वसई रेल्वे येथील तीन आणि आचोळे व गोरेगाव येथील एक एक असे एकूण १५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे २० मोबाईल, ५३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ४२ ग्रॅमचे चांदीचे दागिने, एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपींना ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांत त्यांची पोलीस कोठडी सुरू असून तपास करत आहे. विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी