शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुडूस येथे खड्ड्यांमुळे पादचाऱ्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:28 IST

सात तास रास्ता रोको । भिवंडी-वाडा मार्गावर अपघाताची मालिका सुरूच

वाडा : भिवंडी - वाडा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी रात्री कुडूसजवळील एव्हरशाईन हॉटेलजवळ खड्डा चुकवताना एका टेम्पोने पादचाºयाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. रामप्रसाद गोस्वामी (५६) असे त्याचे नाव आहे. यानंतर शनिवारी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी आक्रमक होत कुडूस नाका येथे सहा ते सात तास महामार्ग रोखून धरला.

आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्याचा ठेका असलेली सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा निषेध नोंदवला. हा रास्ता रोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.शुक्रवारी रात्री कुडूस येथील एव्हरशाईन हॉटेलजवळ एका टेम्पोने खड्डा चुकवताना रामप्रसाद गोस्वामी (५६) या व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर तत्काळ त्याला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आक्र मक होत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन करत सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा पवित्रा घेतल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. वाड्याचे तहसीलदार उद्धव कदम यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि ते आंदोलनस्थळी पोहोचले.

आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हा रस्ता सरकारने सुप्रीम कंपनीकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आल्याचे सांगून रस्ता दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर करण्यात येईल. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे यांनी सुप्रीम कंपनीचे मालक विक्रांत शर्मा, अधिकारी झेड.एन.शेख व चेतन बडगुजर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एफआयआर करण्यात आल्याचे सांगितल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी कुडूस व्यापारी संघटनेने आंदोलनात सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला. च्भिंवडी-वाडा-मनोर हा महामार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला असून येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे दररोज अपघात होत असून निष्पाप लोकांचा बळी जात आहे. दोनच दिवसांपूर्वी (९ आॅक्टोबर) या मार्गावरील दुगाडफाटा येथील अपघातात नेहा शेख या डॉक्टर तरूणीचा बळी गेला होता.