शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वसई विरारमधील उद्याने झालीत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:46 IST

आधी महापालिकेचा हास्यास्पद खुलासा नंतर वाहने हटविली

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने लाखो रूपये खर्चून बांधलेल्या उद्यानांचे सध्या बेकायदा वाहनतळ झाले आहे. पालिका कर्मचा-यांशी मिलीभगत करून धनदांडग्यांच्या आलिशान गाड्या उद्यानात बेकायदेशीररित्या पार्क केल्याच्या तक्रारी नागरीकांकडून येत असतांना, गणेशोत्सवात रस्त्यावर अडचण निर्माण करणारी वाहने तात्पुरती उद्यानात पार्क केल्याचा अजब खुलासा पालिकेच्या प्रभारी सहआयुक्तांनी केला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीया वर फोटो व्हायरल होताच आयुक्तांनी या गाड्या सोमवारी हटविल्या.वसई रोड पश्चिमेकडील आनंदनगर येथे महापालिकेचे वि.दा. सावरकर उद्यान आहे. यात बच्चे कंपनीसाठी विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा म्हणून बसण्याची व्यवस्था केली आहे.मात्र या उद्यानात गेल्या काही दिवसांपासून अनेक खाजगी कारपार्क केलेल्या आहेत. त्यामुळे या उद्यानाला वाहनतळाचे रूप आल्याचा आरोप येथील स्थानिक नागरीकांकडून करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या वाहने उभी केली जात असल्यामुळे लहान मुलांना धड खेळताही येत नाही.उद्यानातील बेकायदा वाहनतळामुळे लहान मुलांची गैरसोय होत असून याबाबत पालिका कर्मचा-यांकडे तक्रार केल्यास ते दुर्लक्ष करतात, असा आरोप स्थानिक रहिवासी अमित शहा यांनी केला आहे या उद्यानात मुले खेळण्यासाठी तसेच जेष्ठ नागरीक विरंगुळा म्हणून येत असतात मात्र अनधिकृत वाहने पार्क केल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.पालिकेचे प्रभाग समिती एचचे प्रभारी सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्वीस यांनी, नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ही वाहने तात्पुरती उद्यानात आणून ठेवली असल्याचे सांगितले गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळे विविध कार्यक्र म करतात. त्यामुळे रस्ता वाहतुकीस अडचण होणारी वाहने हटवून ती उद्यानात ठेवली असल्याचे अजब कारण त्यांनी दिले. सोशल मिडीया वर दोन दिवसांपासून उद्यानाचे फोटो व्हायरल होताच सहाय्यक आयुक्तांनी पालिका कर्मचा-याद्वारे या गाड्या हटविल्या.

टॅग्स :Parkingपार्किंगcarकारVasai Virarवसई विरार