वसईत अ‍ॅम्ब्युलन्सच्या जागी पार्कींग, आवाज उठविणाºयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:44 AM2017-10-04T00:44:54+5:302017-10-04T00:47:44+5:30

नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.

Parking in place of Vasaieth ambulance, raising voice, raising voice | वसईत अ‍ॅम्ब्युलन्सच्या जागी पार्कींग, आवाज उठविणाºयाला मारहाण

वसईत अ‍ॅम्ब्युलन्सच्या जागी पार्कींग, आवाज उठविणाºयाला मारहाण

googlenewsNext

शशी करपे
वसई : नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.
वसई रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला अ‍ॅम्ब्युलन्ससाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी मोटार सायकली उभ्या करून ठेवल्या जात असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स उभी करण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच रिक्शा स्टँडमुळे उर्वरित जागा व्यापली गेली आहे. परिणामी अ‍ॅम्ब्युलन्स ठेवणे मुश्कील होऊन बसले आहे.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्कींगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातून रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांनी रेल्वे परिसरात बेकायदा पार्कींगला मोकळे रान करून दिले आहे. या चारही रेल्वे स्टेशन परिसरात तरुणांच्या टोळक्यांनी बेकायदा पार्कींग सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनबाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग व पादचारी पूलाच्या तोंडावरच मोटार सायकली उभ्या केलेल्या असतात. या मोटार सायकलस्वारांकडून दररोज वसूल करण्यासाठी गुंडप्रवृत्तींच्या मुलांना ठेवण्यात आले आहे. एखाद्या प्रवाशाने पार्कींगवर आवाज उठवला की ही टोळी त्याला मारहाण करीत असते. रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांना दररोज आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता बेकायदा पार्कींगने स्टेशन परिसर व्यापून गेले आहेत. रेल्वे स्टेशनवर एल्फिस्टन रेल्वे स्टेशनसारखी एखादी घटना घडल्यास स्टेशनबाहेर पडतांना प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन दुर्लक्ष करते आहे. शशी करपे
वसई : नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.
वसई रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला अ‍ॅम्ब्युलन्ससाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी मोटार सायकली उभ्या करून ठेवल्या जात असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स उभी करण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच रिक्शा स्टँडमुळे उर्वरित जागा व्यापली गेली आहे. परिणामी अ‍ॅम्ब्युलन्स ठेवणे मुश्कील होऊन बसले आहे.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्कींगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातून रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांनी रेल्वे परिसरात बेकायदा पार्कींगला मोकळे रान करून दिले आहे. या चारही रेल्वे स्टेशन परिसरात तरुणांच्या टोळक्यांनी बेकायदा पार्कींग सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनबाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग व पादचारी पूलाच्या तोंडावरच मोटार सायकली उभ्या केलेल्या असतात. या मोटार सायकलस्वारांकडून दररोज वसूल करण्यासाठी गुंडप्रवृत्तींच्या मुलांना ठेवण्यात आले आहे. एखाद्या प्रवाशाने पार्कींगवर आवाज उठवला की ही टोळी त्याला मारहाण करीत असते. रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांना दररोज आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता बेकायदा पार्कींगने स्टेशन परिसर व्यापून गेले आहेत. रेल्वे स्टेशनवर एल्फिस्टन रेल्वे स्टेशनसारखी एखादी घटना घडल्यास स्टेशनबाहेर पडतांना प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन दुर्लक्ष करते आहे.

Web Title: Parking in place of Vasaieth ambulance, raising voice, raising voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.