शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पर्यटनस्थळ म्हणून निवड होऊनही पाणजूची शोकांतिकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:56 IST

नीती आयोगाची निवड कागदावरच : हक्काचा रस्ता व पादचारी पूल नसल्याने ग्रामस्थांकडून व्यक्त होतेय नाराजी

आशिष राणे

वसई : पाणजू ग्रामस्थांचा खरोखरच विकास करावयाचा असेल तर सरकारची इच्छाशक्ती हवी, सोबत या शहरी भागाला जोडण्यासाठी मुख्य रस्ता अथवा पादचारी पूल नाही ही शोकांतिका असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

इंटरनेटने आज जग जवळ आले असले तरीही दुर्गम भाग असलेल्या जंगलपट्टीत सुद्धा रस्ते तयार होत असून नायगांव व भार्इंदर दरम्यान असलेल्या या पाणजू बेटावर राहणाऱ्या रहिवाशांच्या नशिबी मात्र आयुष्यभर बोटीने प्रवास करण्याचे कुठपर्यंत लिहिले आहे हे मात्र पाणजू वासीयांचे सध्या तरी दुर्दैव असल्याचे खाजगीत म्हणावे लागेल.

गावात ग्रामपंचातीचे उत्पन्न वाढावे म्हणून पालघर जिल्हा परिषेदेकडे २५ लाखाचे कर्ज फेरी बोटींच्या धंद्यासाठी मागितले आहे, ते मिळाल्यास ग्रामपंचायतीची स्वत:ची बोट होऊन ती वापरता येईल व त्यातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीस लागेल. आम्ही नोव्हेंबरमध्ये गावाला नीती आयोगानं पर्यटन स्थळा म्हणून विकसित करण्यासाठी सरकार म्हणून जिल्हाधिकारी व केंद्रीय पथकाने भेट दिली होती तसे झाल्यास गावात प्रेक्षणीय स्थळं, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आदी सोयीसुविधा होतील व याचा फायदा गावातील भूमिपुत्र व ग्रामपंचायतीला नक्कीच होईल. केवळ हक्काचा रस्ता व पादचारी पूल झाल्यास आम्ही खºया अर्थी शहरी भागाला जोडले जाऊ हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे पाणजू चे सरपंच आशिष भोईर यांनी सांगितले.रखडलेल्या भार्इंदर-वसई खाडीला मुहूर्त कधी?वसई विरार प्रदेशाच्या विकासात पाणजू बेटाला ५ किमी असा ३०.६ रु ंदीचा सहा पदरी समांतर रस्ता मिळणार आहे, या पुलावर एम.एम.आर.डी.ए. प्राधिकरण रु पये १०८१ कोटी ६० लक्ष खर्च करणार आहे. त्यावेळी या पुलाच्या बांधकामात खारफुटी व मिठागर यांच्या सह पाणजूवासीयांचा अडथळा होता, मात्र, आता तो दूर झाला आहे. आता हा पूल पाणजूला जोडला जाणार आहे. त्यातच या पुलामुळे अ‍ॅक्सेस मिळाला आहे.बेट समग्र विकास अंतर्गत निधी मिळणार!च्पाणजू बेटाच्या विकासासाठीचा आरखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर व कोकण विभागीय आयुक्त यांनी पाणजू गावाला गतवर्षी नोव्हेंबर मध्ये भेट देऊन पाहणी केली होती.च्बेट समग्र विकास म्हणजेच (हॉलिस्टिक डेव्हलपमेंट आॅफ आयलँडस प्रोग्राम) या कार्यक्र मांतर्गत या बेटाचा पर्यटन विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे.कसा होणार विकासपर्यटनस्थळ नीती आयोगाने देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि देशात एकूण १ हजार३८२ बेटे आहेत. त्यापैकी अगदी पहिल्याच टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार असल्याने या २६ बेटांच्या यादीत पालघर जिल्हा आणि त्यात आपला वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आलेली आहे.