शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पोलीस दलात खांदेपालट; अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 23:36 IST

पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहा. निरीक्षकांचा समावेश

वसई : पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी नुकत्याच बदल्या केल्या आहेत.

वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांची अनैतिक मानवी वाहतूक कक्षात नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या जागी आता वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनंत पराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून जवाहर पोलीस ठाण्यातील गंगाराम वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आनंद मुदलियार यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे महेश विद्याधर शेट्टी यांच्याकडे आता अर्नाळा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा भार देण्यात आला आहे. त्यामुळे अर्नाळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांची आता नियुक्ती जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वसई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टिळेकर यांची देखील नियुक्ती तुळींज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पालघर येथील पोलीस नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ बेग यांच्याकडे वालीव पोलीस ठाण्याचा भार देण्यात आला आहे. किंबहुना अर्नाळा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अरुण भिसे यांची रवानगी आता बोईसर पोलीस ठाण्यात तर तुळींज पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मल्हार थोरात यांना थेट कासा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.

दुसरीकडे मागील आठवड्यातच सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप यांचे अकाली निधन झाले होते. त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतील सुनील जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून तारापूर पोलीस ठाण्याचे सर्जेराव कुंभार यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आली आहे.अधिकारी वर्गात माजली खळबळवसई-विरार, सफाळा आदी भागात पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी मोठा खांदेपालट केल्याने अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय पोलीस अस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार या बदल्या करण्यात आल्याचे पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी स्पष्ट केले आहे. अनेक अधिकाºयांना गैरसोयीच्या ठिकाणी जावे लागल्यामुळे त्यांच्यात नाराजी असल्याचे समजते.

टॅग्स :Policeपोलिस