शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

पालघर नगरपरिषदेची महत्त्वाची कागदपत्रे आढळली खाजगी इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:20 IST

पालघर नगरपरिषदेच्या बिल्डिंग बांधकाम परवानगीच्या शेकडो फायलींसह शिक्के अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे वाघूळसार नजीकच्या ‘कांचन पारिजात’ या इमारतीच्या २०१ या फ्लॅटमध्ये आढळून आली.

हितेन नाईक पालघर : पालघर नगरपरिषदेच्या बिल्डिंग बांधकाम परवानगीच्या शेकडो फायलींसह शिक्के अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे वाघूळसार नजीकच्या ‘कांचन पारिजात’ या इमारतीच्या २०१ या फ्लॅटमध्ये आढळून आली. नगरपालिकेचे काही अधिकारी, नगरसेवकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्याने या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी पालघर पोलिसात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटमधील सर्व दस्तावेज ताब्यात घेतले. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली.कांचन पारिजात या इमारतीच्या फ्लॅटमध्ये मिळालेल्या कागदपत्रांमध्ये नगरपालिका कार्यालयातील बांधकामच्या परवानगीच्या फाईल्स, अर्ज-परवानगीच्या पत्रावर मारण्यात येणारे आवक जावकचे शिक्के, रहिवास, वाणिज्य औद्योगिक, लघू औद्योगिक, सामान्य सुविधा केंद्रासाठी दुकाने प्रयोजनार्थ नकाशांना मान्यता देण्याच्या कागदपत्रांवर मारण्यात येणारा शिक्का असे साहित्य सापडले आहे. बोगस औषध खरेदी घोटाळा, विद्युत साहित्य खरेदी घोटाळा, भुयारी गटार निधी घोटाळा अशा अनेक छोट्या मोठ्या घोटाळ्याच्या प्रकरणाने नगरपालिका वादग्रस्त ठरली आहे. अशावेळी वसईतील एका बिल्डरच्या खाजगी फ्लॅटमध्ये नगरपालिका कार्यालयातील फाईल्स आणि शिक्के सापडण्यासारखी गंभीर बाब नगरपालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक सहभागाशिवाय शक्य नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या फ्लॅटमध्ये आढळलेल्या सुमारे १२७ फाईल्स, शिक्के, कॉम्प्युटर, प्रिंटर, नगरपालिकेचा डीपी नकाशा असे महत्त्वपूर्ण दस्तावेज पाहिल्यावर हे नगरपालिकेचे दुसरे कार्यालय तर नाही ना? अशी शंका मनात निर्माण होते.नगरपरिषदेचे अलीकडेच बदली होऊन गेलेले नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर हे पालघरमधील एका फ्लॅटमध्ये असून तेथे काही आर्किटेक्ट, बिल्डरांसोबत त्यांच्या बिल्डिंग परवानगी फाईलमधील त्रूटी कमी करून त्यावर आधीच्या तारखेच्या (बॅक डेटेड) सह्या करण्याचे काम सुरू असल्याची महिती भाजपाचे गटनेते भावानंद संखे, नगरसेवक अरुण माने यांना कळल्यावर त्यांनी थेट फ्लॅटमध्ये शिरकाव केला. त्यावेळी १० ते १५ लोकांसोबत क्षीरसागर काही फायलींवर शिक्के आणि सह्या करीत असल्याचे निदर्शनास आले होते. यात नगरपालिकेचे नगररचना अभियंता दर्शन नागदासह पालघरमधील काही आर्किटेक्ट, आणि बिल्डरही होते. या नगरसेवकांना पाहिल्यानंतर सर्वांची एकच पळापळ सुरू झाली. एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे घटनास्थळी उपस्थित झाले. फ्लॅटमध्ये गर्दी झाल्याचा फायदा उचलत क्षीरसागरच्या खोलीतील टेबलावरील सुुमारे दीड लाखांची रोख रक्कम लंपास करण्यात आली.>अनेक बेकायदा प्रस्तावांना फ्लॅटमधून दिल्या परवानग्या?अभियंता क्षीरसागर हे १ जून २०१७ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत नगरपरिषद कार्यरत होते. त्यानंतर त्यांना आयुक्त तथा संचालक यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, २० एप्रिलपर्यंतच्या माझ्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीदरम्यान नगरपालिकेत क्षीरसागर मला कधीच दिसला नसल्याचे तत्कालीन नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांचे म्हणणे आहे.दरम्यान, नगरपालिकेच्या काही फायलींचे हँडवर्क करण्यासाठी आपण या फ्लॅटमध्ये आल्याचे अभियंता क्षीरसागर यांचे म्हणणे आहे.>सदगुरू हॉटेलच्या मागे एका बिल्डिंग उभारण्याच्या एका प्रस्तावाला बेकायदेशीररित्या परवानगी देण्यात आल्या असून या फ्लॅटमध्ये अशा अनेक प्रस्तावांना परवानग्या देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या फ्लॅटमधील अनेक सह्या करण्यात आलेल्या फायली उपस्थितांपैकी काही व्यक्तींनी नेल्याची माहिती पुढे येत असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी होत आहे.